Banking News : भारतीय बँक आता आठवड्यातून फक्त ५ दिवसच सुरु राहणार आहे. इंडियन बँकिंग असोसिएशनकडून बँक कर्मचाऱ्यांना साप्ताहिक २ सुट्ट्या देण्याचा लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
इंडियन बँकिंग असोसिएशनकडून २८ जुलै रोजी बँक कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली जाऊ शकते. इंडियन बँकिंग असोसिएशनकडून या दिवशी कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्टीचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) पुढील आठवड्यात शुक्रवारी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) सोबतच्या बैठकीत बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्टीबाबत निर्णय घेऊ शकते.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 19 जुलै रोजी सांगितले की त्यांनी आठवड्यातून फक्त ५ दिवस बँक सुरु ठेवण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. आयबीएने माहिती दिली की हा मुद्दा विविध भागधारकांच्या सक्रिय विचाराधीन आहे आणि त्यावर विचार केला जात आहे.
लवकरच आयबीएकडून बँक कर्मचाऱ्यांना ५ दिवसच बँक सुरु ठेवण्याचा निर्णय लागू केला जाऊ शकतो. त्यामुळे आता ग्राहकांच्या सेवेसाठी आठवड्यातून फक्त ५ दिवसच बँक सुरु राहणार आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँकिंग असोसिएशन या दोन्ही संस्थांकडून बँक कर्मचाऱ्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी दिली जाण्याच्या निर्णयावर विचार करत आहे. तसेच त्यांच्याकडून यावर कामही सुरु केले असल्याचे बोलले जात आहे.
इंडियन बँकिंग असोसिएशन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँकिंग असोसिएशन या दोन्ही संस्थांकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा, वेतन वाढ आणि सेवानिवृत्तांसाठी गट वैद्यकीय विमा पॉलिसींची गरज यावर २८ जुलै रोजी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सद्यस्थिती कशी आहे?
सध्या बँक कर्मचाऱ्यांना महिन्याच्या चार शनिवारपैकी २ शनिवारी सुट्टी दिली जात आहे. तर दोन शनिवारी कामावर बोलवले जाते. बँक दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात तर तिसऱ्या आणि पहिल्या शनिवारी बँक सुरु असतात. मात्र आता कर्मचाऱ्यांना या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी देखील सुट्टी मिळण्याची शक्यता आहे.