Banking News : तुमचेही एखाद्या बँकेत खाते असेल, नाही का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे. खरेतर आपल्या बँक अकाउंट मध्ये असणाऱ्या पैशांवर आपला सर्वस्वी अधिकार असतो. मात्र जर बँक खातेधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणाऱ्या पैशांवर कोणाचा अधिकार असतो? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे का.
मंडळी तुम्हाला माहीतच असेल की जेव्हा आपण बँकेत अकाउंट ओपन करतो त्यावेळी त्यांच्यातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या बँक अकाउंटला नॉमिनी जोडायला सांगितले जाते.
नॉमिनी जोडण्यासाठी नॉमिनीचं नाव, खातेदाराशी असलेले नातेसंबंध, वय, पत्ता इत्यादी माहिती द्यावी लागते. नॉमिनी हा खूपच महत्वाचा असतो. कारण की बँक खातेधारकाच्या मृत्यूनंतर सदर मयत व्यक्तीच्या बँक अकाउंट मध्ये असणारे पैसे हे नॉमिनीला दिले जातात.
पण जर समजा एखाद्या व्यक्तीच्या बँक अकाउंटला नॉमिनी जोडलेला नसेल तर अशा प्रकरणात त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे पैसे कोणाला मिळतात ? हा मोठा प्रश्न उभा केला जात आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
बँक अकाउंटला नॉमिनी नसेल तर कोणाला पैसे मिळणार?
जर एखाद्या व्यक्तीनं आपल्या बँक खात्यासाठी कोणालाही नॉमिनी बनवलेलं नसेल तर त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झालेल्या पैशांवर कोणाचा अधिकार असेल अशी विचारणा सातत्याने केली जाते.
नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या अकाउंटला नॉमिनी जोडलेला नसेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या अकाउंट मध्ये असणारे सर्व पैसे त्याच्या कायदेशीर वारसदाराला दिले जातील. आता प्रश्न असा की कायदेशीर वारसदार कोणाला म्हणावे.
तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, विवाहित पुरुषाचे कायदेशीर वारसदार त्याची पत्नी, मुले आणि आई-वडील असतात. जर मृत खातेदार अविवाहित असेल तर त्याचे आई-वडील, भावंडे त्याचा कायदेशीर वारसदार म्हणून दावा करू शकतात.
पण एखाद्या व्यक्तीने त्याच्या बँक अकाउंटला नॉमिनी जोडलेले नसेल तर अशा व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना सदर मयत व्यक्तीच्या बँक अकाउंट मधून पैसे काढण्यासाठी अनेक कागदपत्रांची गरज भासत असते.
कागदपत्र म्हणून कायदेशीर वारसदाराला मृत खातेदाराचा मृत्यूचा दाखला, कायदेशीर वारसदाराचा फोटो, केवायसी, डिस्क्लेमर एनेक्सचर-ए, लेटर ऑफ इडेम्निटी एनेक्सचर-सी ची गरज भासत असते.