आर्थिक

Investment Tips : एफडी करून पैसे कमवा ! ही बँक देईल सर्वात जास्त व्याज..

Published by
Ajay Patil

Investment Tips :- नोकरी किंवा व्यवसाय करून कमावलेला पैसा व त्या पैशांची केलेली बचत आणि बचतीची केलेली गुंतवणूक हे आर्थिक समृद्धीच्या दृष्टिकोनातून आणि भविष्यकालीन आर्थिक सुरक्षितता यासाठी खूप महत्त्वाचे असते. परंतु कष्टाने कमावलेला पैसा सुरक्षित राहणे  याला देखील गुंतवणूक करताना प्राधान्य देणे गरजेचे असते.

त्यामुळे गुंतवणूक करताना कोणताही व्यक्ती हा गुंतवणुकीची सुरक्षितता आणि आपल्याला गुंतवणूक केल्यावर किती फायदा होईल? म्हणजेच  किती परतावा मिळेल याचा सारासार विचार करूनच गुंतवणूक करत असतात. त्यामुळे बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी बँकांच्या मुदत ठेव योजनांना सर्वात जास्त पसंती देतात.

कारण मुदत ठेव हा सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला प्रकार असून त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत योग्य व्याजदर पाहून अनेक खातेदार मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करतात. याच पद्धतीने तुमचा देखील एफडी करण्याचा प्लॅनिंग असेल तर तुम्हाला बँकांच्या माध्यमातून मिळणारा व्याजदर माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे.

कारण गेल्या दोन महिन्याच्या कालावधीचा विचार केला तर सार्वजनिक क्षेत्रातील अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदरात बदल केलेले आहेत. या अनुषंगाने या लेखात आपण कोणत्या बँकांनी व्याजदरात बदल केले व आता किती व्याजदर मिळत आहे? त्याबद्दलची माहिती बघू.

 या बँकांनी एफडीवरील व्याज दरात केले आहेत बदल

ऑगस्ट महिन्यामध्ये देशातील सर्वात प्रमुख बँकांनी जवळपास व्याजदरात बदल केलेले आहेत. यामध्ये जर आपण बँक निहाय पाहिले तर…..

1- युनियन बँक ऑफ इंडियाने मुदत ठेवींवर सर्वाधिक म्हणजेच 333 दिवसांकरिता 7.40 टक्क्यांचा व्याजदर देऊ केला आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठी( साठ वर्ष आणि त्याहून अधिक) 0.50 टक्क्यांचा अधिकचा व्याजदर देऊ केला आहे. तसेच 80 वर्षाहून अधिक वय असलेले जे अति जेष्ठ नागरिक असतील त्यांना 0.75% अधिक व्याज मिळणार आहे.

2- बँक ऑफ बडोदा महत्वाच्या असलेल्या बँक ऑफ बडोदा या बँकेने 399 दिवसांसाठी 7.25 टक्क्यांचा व्याजदर देऊ केला आहे.

3- बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्रने देखील 777 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 7.25 टक्के इतका व्याजदर देऊ केला.

4- कॅनरा बँक कॅनरा बँकेने देखील 444 दिवसांच्या मुदत ठेवीसाठी 7.25% इतका व्याजदर देऊ केला.

5- सेंट्रल बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाने देखील 444 दिवसांसाठी 7.3% इतका व्याजदर देऊ केला आहे.

6- इंडियन बँक इंडियन बँकेने चारशे दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.25% इतका व्याजदर देऊ केला आहे.

7- इंडियन ओव्हरसीस बँक इंडियन ओव्हरसीज बँकेने 444 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.3% व्याजदर देऊ केला आहे.

8- पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेने चारशे दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.25% इतका व्याजदर देऊ केला आहे.

9- पंजाब अँड सिंध बँक पंजाब आणि सिंध बँकेने देखील मुदत ठेवीवर 7.3% व्याजदर देऊ केला आहे.

10- स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया ने 444 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.25 टक्के व्याजदर देऊ केला आहे.

11- युनियन बँक युनियन बँकेने 333 दिवसांच्या मुदत ठेवीवर 7.4 टक्के व्याजदर देऊ केला आहे.

 याशिवाय

बँक ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून मर्यादित कालावधीसाठी विशेष मुदत ठेव योजना देखील सुरू करण्यात आलेले आहेत. यामध्ये जर बँक ऑफ इंडियाची विशेष मुदत ठेव योजना बघितली तर यामध्ये दोन कोटी पर्यंतच्या ठेवीवर 666 दिवसांकरिता सामान्य खातेदारांना 7.30%, ज्येष्ठ नागरिकांना 7.80% तर अति ज्येष्ठ नागरिकांना म्हणजेच 80 वर्षाच्या पुढील नागरिकांना 7.95% इतका व्याजदर मिळणार आहे.

त्यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडियाने देखील अमृत वृष्टी नावाची एक मर्यादित कालावधीसाठीची मुदत योजना जाहीर केली असून यामध्ये भारत आणि अनिवासी भारतीय खातेदारांकरिता अधिक व्याज देणारी योजना जाहीर केली असून ही 15 जुलैपासून सुरू झाली आहे.

Ajay Patil