Banking News : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील एका मोठ्या बँकेचा परवाना रद्द केला आहे. त्यामुळे या बँकेतील ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. RBI कडून बँकेबाबत अनेक निर्बंध लादले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून उत्तर प्रदेशातील सहकारी बँक युनायटेड इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. कमी कमाईची क्षमता आणि अपुरे भांडवल या निशाच्या आधारावर RBI कडून परवाना रद्द करण्यात आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँकेचा परवाना रद्द करण्यात आल्याने बुधवारी संध्याकाळपासून बँक कोणत्याही प्रकारचा व्यवसाय करू शकणार नाही. याबद्दल RBI कडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले आहे. ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा विचार करत RBI कडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
19 जुलै 2023 पासून युनायटेड इंडिया को- ऑपरेटिव्ह बँकेत कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक काम होणार नाही. ग्राहकांकडून या बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचे पैसे जमा करून घेतले जाणार नाहीत. तसेच पैसेही काढता येणार नाहीत. बँकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बँक ग्राहकांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही असे RBI कडून सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक व्यवहाराचे काम करू शकणार नाही
युनायटेड इंडिया को- ऑपरेटिव्ह बँकैची आर्थिक कोणतीही प्रगती नाही तसेच अपुरे भांडवल असल्याने RBI कडून हा निर्णय घेण्यात आला आहे. युनायटेड इंडिया को- ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बँकिंग नियमन कायद्याच्या 22(3) (A), 22(3) B, 22 (3) C, 22 (3) (D) आणि 22 (3E) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात अयशस्वी ठरली. त्यामुळे बँकेचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
ग्राहकांच्या पैशाचे काय होईल
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून बँक ठेवीदार आणि ग्राहकांचे पूर्ण पैसे परत करू शकणार असे सांगण्यात आले आहे. बँकेचे ग्राहक ठेवीदार नियमांनुसार डिपॉझिट आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DIGCS) मधून 5,00,000 रुपयांपर्यंत पैसे काढू शकतात.