Banking Rule:- आपल्यापैकी प्रत्येकाला बँकेच्या व्यवहारांचा अनुभव असतो किंवा माहिती असते. बँकेच्या व्यवहारामध्ये आपल्याला अनेक गोष्टींची माहिती असणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आरटीजीएस तसेच एनईएफटी इत्यादी मोडचा वापर केला जातो. याविषयी देखील संपूर्ण माहिती असणे बँकिंग व्यवहाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे.
तसेच बरेच व्यवहार चेकच्या माध्यमातून केले जातात व यामध्ये देखील खूप काही नियम असून ते देखील आपल्याला माहीत असणे खूप गरजेचे आहे. या सगळ्या संकल्पनेशिवाय आयएफसी कोड ही संकल्पना देखील बँकिंग व्यवहाराच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला बँकेतून पैसे ट्रान्सफर करायचे असतात तेव्हा तुम्हाला संबंधित व्यक्तीचा बँक खाते नंबर व इतर तपशील द्यावा लागतोच.
परंतु त्याशिवाय तुम्हाला संबंधित व्यक्तीच्या बँक शाखेचा आयएफएससी कोड देणेदेखील खूप गरजेचे असते. या अनुषंगाने नेमका आयएफसी कोड काय असतो किंवा त्याचे महत्त्व बँकिंग व्यवहारांमध्ये काय आहे? याची देखील माहिती आपल्याला असणे खूप गरजेचे आहे. याच दृष्टिकोनातून आपण आयएफसी कोड बद्दल माहिती घेणार आहोत.
आयएफसी कोड नेमका काय असतो?
हा एक अकरा कॅरेक्टर म्हणजेच अक्षरे व अंक असलेला एक अल्फान्यूमेरिक कोड असून बँकेच्या प्रत्येक शाखेकरिता हा युनिक कोड नंबर दिलेला असतो. या 11 नंबर पैकी आपण पहिल्या चार कॅरेक्टर अर्थात नंबरचा विचार केला तर यावरून आपल्याला संबंधित बँक कोणती आहे याचा अंदाज येतो किंवा बँक कोणती आहे हे समजते. पहिल्या चार अंकांव्यतिरिक्त पाचवा अंक किंवा कॅरेक्टर हे शून्य असते व उरलेले सहा कॅरेक्टर हे संबंधित बँकेच्या शाखेचा कोड नंबर असतो व तो न्यूमेरिक म्हणजेच अंकांमध्ये असतो.
आयएफसी कोडचा फायदा काय असतो?
पैसे पाठवण्यासाठी प्रामुख्याने बँकेच्या माध्यमातून आरटीजीएस किंवा एनईएफटी व आयएमपीएस इत्यादी पर्यायांचा वापर करत असतो. यामध्ये पैसे पाठवण्याची प्रक्रिया ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होते व यासाठी दोन्ही बँकांना आयएफएससी कोड असणे खूप गरजेचे आहे. या कोड मुळे पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया कमीत कमी वेळेमध्ये आणि सुरक्षित पद्धतीने होते.
जर तुम्ही एनइएफटी च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करत असाल तर बँकेच्या कामकाजाच्या वेळात पैसे ट्रान्सफर केले तर तुम्हाला तासाभरामध्ये ती रक्कम खात्यात जमा होते. या ऐवजी जर तुम्ही आयएमपीएस किंवा आरटीजीएस या पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले तर काही मिनिटांमध्ये संबंधित रक्कम व्यक्तीच्या खात्यात जमा होते. आयएफसी कोड मुळे ऑनलाइन पेमेंट सुरक्षित व त्वरित मिळणे सुलभ झाले आहे. समजा तुम्ही खाते नंबर किंवा नावात जरी काही चूक केली तरी पाठवलेले पैसे हे आयएफसी कोड मुळे चुकीच्या खात्यात जात नाहीत.
आयएफसी कोड माहीत नसेल तर काय करावे?
तुम्हाला तुमच्या मित्राला किंवा एखाद्या व्यक्तीला काही पैसे ट्रान्सफर करायचे आहेत व तुम्हाला त्या व्यक्तीच्या बँकेचा आयएफसी कोडच माहिती नाही तर अशावेळी तुम्ही एनईएफटी किंवा आरटीजीएस किंवा आयएमपीएस यापैकी जो पर्याय तुम्ही निवडला असेल त्यानुसार तुम्ही प्रथम ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचे नाव, त्यामध्ये व्यक्तीचा बँकेचे व शाखेचे नाव व खाते नंबर ही माहिती भरून जर सर्च केले तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या बँकेचा आयएफसी कोड मिळू शकतो व हा कोड टाकून तुम्ही पैसे ट्रान्सफर करू शकता.