आर्थिक

आज हे 10 स्टॉक खरेदी कराल तर राहाल खूपच फायद्यात! तज्ञांनी सुचवलेले खास आहेत ‘हे’ स्टॉक

Published by
Ratnakar Ashok Patil

Breakout Stocks:- आज 17 जानेवारीला शेअर मार्केटची सुरुवात ही घसरणीने झाली व सेन्सेक्समध्ये 400 पेक्षा अधिक अंकांची घसरण होऊन सध्या सेन्सेक्स 76600 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तसेच निफ्टी देखील जवळपास 100 पेक्षा जास्त अंकांनी घसरला असून सध्या 23 हजार 200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसापासून शेअर मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळाली होती. परंतु त्यानंतर मात्र आज घसरणीने सुरुवात झालेली आहे. परंतु असे असताना देखील चॉईस ब्रोकिंगचे एक्झिटिव्ह डायरेक्टर सुमित बगरिया यांनी काही कंपन्यांमध्ये खरेदी करायच्या ब्रेकआउट शेअर खरेदीची शिफारस केलेली आहे.यासोबतच इतर काही तज्ञांनी देखील काही शेअर खरेदीची शिफारस केलेली आहे.

हे शेअर खरेदी करणे ठरेल फायद्याचे

( सुमित बागरिया यांनी सुचवलेले ब्रेकआउट शेअर)

1- रामकृष्ण फोर्जिंग्स- सुमित बागरिया यांनी हा शेअर 990.40 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच याकरिता 1050 रुपयाचे टार्गेट व 950 रुपयांचा स्टॉपलॉस दिला आहे.

2- व्ही 2 रिटेल- हा शेअर 1871.75 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे व टार्गेट 2020 व स्टॉपलॉस 1800 रुपयांचा दिला आहे.

3- नॅकडॅक इन्फ्रास्ट्रक्चर- हा शेअर 83 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे व टार्गेट 90 रुपयाचे व स्टॉपलॉस 80 रुपयाचा ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

4- स्टोव्ह क्राफ्ट- हा शेअर 942.80 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे व एक हजार दहा रुपयांचे टार्गेट आणि 905 रुपयांचा स्टॉपलॉस ठेवायला सांगण्यात आले आहे.

5-ईमुद्रा- हा शेअर 965.20 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे व टार्गेट 1130 रुपये आणि स्टॉपलॉस 925 रुपयांचा देण्यात आला आहे.

आनंद राठी टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी सुचवलेले शेअर

1- गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड- हा शेअर 2365 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे व याकरिता टार्गेट 2460 रुपये आणि स्टॉपलॉस 2310 रुपये ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

2- आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेड- हा शेअर 276 रुपयांना खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे व स्टॉपलॉस 270 रुपयांचा आणि टार्गेट प्राईस 289 रुपये ठेवण्याचे सांगण्यात आले आहे.

3- ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड- या शेअरवर बाय रेटिंग देण्यात आलेली आहे. हा शेअर 2359 रुपयांना खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे व याकरिता टार्गेट प्राईस 2420 रुपये आणि स्टॉपलॉस 2320 ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
सुमित बागरीया यांनी सुचवलेले इतर स्टॉक

1- गणेश हाउसिंग कार्पोरेशन लिमिटेड- हा शेअर १३१३ रुपयांना खरेदी करण्याच्या सांगण्यात आले आहे तर यासाठीचा स्टॉप लॉस 1265 रुपये तर टार्गेट प्राईज 1400 रुपये ठेवण्यास सांगण्यात आलेले आहे.

( टीप- वरील माहिती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केलेली आहे. या माध्यमातून अहमदनगर लाईव्ह 24 कुठल्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूक तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil