रोज 100 रुपयांची बचत करून व्हा करोडोपती; जाणून घ्या गुंतवणुकीचा पर्याय…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIP Calculator : सध्या भविष्याचा विचार करता जास्तीत जास्त लोकं म्युच्युअल फंडामध्ये एसआयपीद्वारे गुंतवणूक करत आहेत. जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. एसआयपी हा असाच एक गुंतवणुकीचा पर्याय आहे, ज्याद्वारे तुम्ही नियमित छोट्या बचतींमधूनही इक्विटी सारखे परतावे मिळवू शकता.

जर तुम्ही दर महिन्याला गुंतवणुकीची सवय लावली तर तुम्ही दीर्घकालीन लाखो आणि कोटींचा निधी तयार करू शकता. जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवत असाल आणि दर महिन्याला SIP मध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडला तर तुम्ही 30 वर्षांत 1 कोटी रुपयांचा निधी सहज तयार करू शकता.

समजा तुम्ही दररोज 100 रुपयांची बचत केली तर तुमची बचत दरमहा 3000 रुपये होईल. जर तुम्ही दरमहा 3000 रुपयांची SIP करत असाल आणि 12% वार्षिक परतावा देखील मिळत असेल, तर तुम्ही 30 वर्षात 1,05,89,741 चा निधी तयार करू शकता. यामध्ये तुमची गुंतवणूक 10,80,000 रुपये असेल. तर, अंदाजे संपत्ती वाढ 95,09,741 रुपये असेल.

बहुतेक म्युच्युअल फंड हाऊसेस आता गुंतवणूकदारांना डेली एसआयपीचा पर्याय देखील देत आहेत. ही अशी सुविधा आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदारांना दररोज त्यांच्या आवडीच्या योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळते.

विशेष म्हणजे याद्वारे दररोज किमान १०० रुपयांची गुंतवणूक करता येते. दैनंदिन एसआयपी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीच्या खर्चाची सरासरी काढण्यात आणि त्यांच्या गुंतवणुकीवरील बाजारातील अस्थिरतेचा प्रभाव कमी करण्यात मदत करतात. SIP मध्ये धोका असतो. त्यामुळे गुंतवणूकदाराने आपले उत्पन्न, लक्ष्य आणि जोखीम प्रोफाइल पाहून गुंतवणूक ठरवावी.

SIP सध्या जोरदार कामगिरी करत आहे. जून 2023 मध्ये देखील SIP च्या माध्यमातून 14,734 कोटींहून अधिक गुंतवणूक करण्यात आली आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) च्या क्रेझचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की खात्यांची संख्या विक्रमी 6.65 कोटी ओलांडली आहे. या वर्षी जूनमध्ये नवीन एसआयपी नोंदणी 27.78 लाखांपेक्षा जास्त होती. जे आतापर्यंतचे सर्वोच्च आहे.