आर्थिक

कमी पगारात देखील पैसे वाचवा आणि वाढवा! ‘या’ टिप्स फॉलो करा,होईल फायदा

Published by
Ratnakar Ashok Patil

Become Rich Tips:- तुम्ही किती पैसे कमवतात याला जितके महत्त्व आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्ही कमवत असलेल्या पैशाची बचत कशी करता आणि केलेली बचत तुम्ही कोणत्या पद्धतीने गुंतवणूक करतात याला खूप महत्त्व असते. याबाबतीत फायनान्शिअल प्लॅनिंग म्हणजेच आर्थिक नियोजन आणि आर्थिक शिस्त या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात.

जर आर्थिक नियोजन किंवा शिस्त जर नसेल तर मात्र तुम्ही किती जरी पैसा कमावला तरी देखील तुमच्याकडे पैसा टिकत नाही. पैसा टिकला नाही म्हणजे पैशांची बचत झाली नाही तर तुम्ही गुंतवणूक करू शकत नाहीत आणि गुंतवणूक केली नाही तर मात्र आर्थिक दृष्ट्या समृद्ध जीवन जगणे तुम्हाला शक्यच होऊ शकत नाही.

म्हणून तुम्हाला कमी पगार जरी असला तरी त्यातून जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला गुंतवणूक प्लॅनिंग करणे गरजेचे आहे व तीही अगदी शिस्तबद्ध रीतीने. याकरिता आपण या लेखामध्ये अशा काही टिप्स बघणार आहोत की ज्या तुम्हाला कमी पगारात देखील पैसे वाचवायला मदत करतील.

‘या’ टिप्स वापरा आणि कमी पगारात देखील पैसे वाचवा

1- सगळ्यात अगोदर बजेट बनवा- तुम्हाला जर पैसा वाचवून गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात अगोदर तुम्ही कमवत असलेल्या पैशांचा बजेट म्हणजेच महिन्याचा बजेट बनवणे खूप गरजेचे आहे.

यामध्ये तुमच्या खर्चाचे नियोजन व त्याबरोबरच गुंतवणूक यासारख्या इतर गोष्टींचे व्यवस्थित नियोजन करणे गरजेचे आहे व तेही आर्थिक शिस्तीमध्ये राहून व त्यानंतर वर्षाचा किंवा महिन्याचा बजेट तयार करावा लागेल आणि त्यानुसार तुम्हाला बचत करून गुंतवणूक देखील करावी लागेल.

2- इमर्जन्सी फंड तयारच ठेवा- जीवन जगत असताना जीवनामध्ये कुठली परिस्थिती केव्हा आणि कशा पद्धतीची निर्माण होईल याच्याबद्दल आपल्याला काही सांगता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तुम्ही आर्थिकदृष्ट्या समृद्ध असणे खूप गरजेचे आहे व त्याकरिता तुम्ही जेव्हा कामधंदा किंवा नोकरी करत आहात त्या कालावधीतच आपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी फंड तयार करून ठेवणे गरजेचे आहे.

हा फंड तयार करताना अशा पद्धतीने नियोजन करा की, तुम्ही पुढील चार ते पाच महिने कुठल्याही कामाशिवाय घरी जरी राहिलात तरी देखील तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडणार नाही किंवा पैसे नसल्यामुळे तुम्हाला समस्या निर्माण होणार नाहीत.

3- अनावश्यक खर्च करणे टाळा- बऱ्याच जणांना शॉपिंग किंवा महागडी कपडे विकत घेणे किंवा चांगल्या रेस्टॉरंटमध्ये वारंवार जाणे अशा पद्धतीच्या सवयी असतात.

परंतु तुम्हाला जर बचतच करायची असेल व गुंतवणूक करून आर्थिक समृद्ध व्हायचे असेल तर या गोष्टी तुम्हाला अगोदर बंद करणे गरजेचे राहिल किंवा त्याचे प्रमाण कमी करणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

4- गुंतवणुकीचे पर्याय शोधा- तुम्हाला जर गुंतवणुकीतून लवकरात लवकर मोठा फंड किंवा कॉर्पस जमा करायचा असेल तर तुम्ही गुंतवणुकीचे वेगवेगळे मार्ग शोधणे खूप गरजेचे आहे.

तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील व चांगला परतावा मिळेल अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक सुरू करणे तुमच्या फायद्याचे ठरेल व यासाठी तुम्ही एसआयपी किंवा पोस्ट ऑफिस आणि बँकांसारख्या सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवू शकतात.

5- इच्छांवर नियंत्रण ठेवा- आपल्यापैकी बऱ्याच जणांना सवय असते की,आपण जेव्हा बाहेर कुठे जातो तेव्हा एखादी नवीन गोष्ट पहिली किंवा वस्तू पाहिली तर खरेदी करण्याची इच्छा होते व ती आपण खरेदी करतो. परंतु अशा वस्तू खरेदी करताना खरच त्या वस्तूची आपल्याला गरज आहे का या गोष्टींचा विचार करत नाही व खर्च करत सुटतो.

त्यामुळे अशा प्रकारच्या जर तुमच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होत असतील तर त्या वेळेत नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे आहे. पैसे ज्या ठिकाणी अनावश्यकपणे खर्च होतील अशा इच्छा नियंत्रित करता येणे जर तुम्हाला जमले तर तुम्ही पैशांची चांगली बचत करू शकता.

Ratnakar Ashok Patil

Published by
Ratnakar Ashok Patil