BEL Share Target Price:- आजच्या शेअर बाजाराच्या घसरणीमध्ये जर आपण फोकसमध्ये आलेले शेअर बघितले तर त्यामध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अर्थात BEL च्या शेअरचा देखील समावेश होता. सध्या या कंपनीचा शेअर 280 रुपयांवर ट्रेड करत असून हा शेअर त्याच्या उच्चांकी पातळीवरून 20 टक्क्यांनी घसरला आहे.
परंतु 17 जानेवारी 2025 रोजी या कंपनीच्या शेअरमध्ये 29 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले व या वाढीसह 279.75 रुपयांवर पोहोचला. तसेच प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे व त्यांनी हा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे.
प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी काय रिपोर्ट जारी केला?
मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज फर्मने भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या बाबतीत एक रिपोर्ट जारी केला असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,डिफेन्स क्षेत्रातील ही एक दिग्गज कंपनी आहे.
येणाऱ्या कालावधीत या कंपनीला MRSAM, QRSAM आणि तेजस Mk1A साठी मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याची शक्यता यामध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. इतकेच नाहीतर ही कंपनी नॉन डिफेन्स रेवेन्यू आणि एक्स्पोर्ट वाढवण्यावर देखील भर देत असल्याचे ब्रोकरेजने म्हटले आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीची दमदार ऑर्डर बुक
मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये म्हणजेच 1 ऑक्टोबर 2024 पर्यंत या कंपनीची ऑर्डर बुक 74595 कोटी रुपये होती व त्यानंतर कंपनीला अनेक नवनवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच 2025 या आर्थिक वर्षांमध्ये आतापर्यंत या कंपनीला दहा हजार 362 कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त झाले आहेत.
सगळ्यात महत्त्वाची म्हणजे येणाऱ्या कालावधीत क्विक रिएक्शन सरफेस टू एयर क्षेपणास्त्र अर्थात ORSAM साठी 25 ते 30 हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतात असा कंपनीचा अंदाज आहे व या आर्थिक वर्षात या कंपनीने 2500 कोटी रुपयांचे नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कंपनीसाठी सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या शेअरसाठी तज्ञांनी दिली ही टार्गेट प्राईस
भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनी शेअरकरिता तज्ञांच्या माध्यमातून 360 रुपये टार्गेट प्राईस देण्यात आली आहे व देण्यात आलेली ही प्राईस सध्याच्या या शेअरच्या किंमत पातळीपेक्षा 30 टक्क्यांनी अधिक आहे.