Post Office RD : जर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे, आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या अशा योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिन्याला छोटी बचत करून मोठा निधी उभारू शकता.
प्रथम पोस्टाच्या आरडीबद्दल बोलूयात, पोस्टाची ही योजना पिग्गी बँकेसारखे आहे. यामध्ये तुम्ही सलग 5 वर्षे दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करून भविष्यात चांगली रक्कम जमा करू शकता. या योजनेत तुम्हाला मुदतपूर्तीनंतर, व्याजासह परत केली जाते. सध्या या योजनेवर 6.7 टक्के दराने व्याज दिले जात आहेत. कोणतीही व्यक्ती या योजनेत 100 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकते.
पोस्ट ऑफिसमध्ये चालणाऱ्या मुदत ठेव योजनेला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट देखील म्हणतात. यामध्ये 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी एकरकमी रक्कम जमा करता येते. कालावधीनुसार व्याजदर बदलतो. एका वर्षासाठी 6.9 टक्के, दोन वर्षांसाठी 7 टक्के, तीन वर्षांसाठी 7.1 टक्के आणि 5 वर्षांसाठी 7.5 टक्के व्याज उपलब्ध आहे. यामध्ये किमान 1000 रुपयांपर्यंतही ठेव करता येतील. यात गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही, तुमच्या तुमच्या सोयीनुसार गुंतवणूक करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या MIS मध्ये देखील 1000 रुपयांपसून गुंतवणूक करता येते. तर कमाल गुंतवणूक एकल खात्यात 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपये आहे. दरमहा व्याजाद्वारे पैसे कमवायचे असतील तर ही योजना उत्तम आहे, यात व्याजदर 7.4 टक्के दराने दिले जाते. तुमचे पैसे यात 5 वर्षांसाठी जमा केले जातात ज्यावर तुम्हाला दरमहा व्याज दिला जातो.
पोस्टाची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही देखील एक उत्तम योजना आहे जी 15 वर्षे चालवली जाते. यात वार्षिक किमान 500 रुपयांची गुंतवणूक केली जाऊ शकते आणि कमाल गुंतवणूक 1.5 लाख रुपये आहे. या योजनेत 7.1 टक्के दराने व्याज दिले जाते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही देखील एकरकमी ठेव योजना आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते. जास्तीत जास्त 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. ज्येष्ठ नागरिकांसाठी चालवल्या जाणाऱ्या या 5 वर्षांच्या ठेव योजनेवर सरकार 8.2 टक्के दराने व्याज देते. सेवानिवृत्त लोकांसाठी ही योजना अतिशय चांगली आहे.
कोणताही भारतीय नागरिक नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये फक्त 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. सध्या या योजनेवर 7.7 टक्के दराने व्याज दिले जात आहे. या योजनेत तुम्ही 5 वर्षांसाठी रक्कम जमा करून चांगल्या व्याजदराचा लाभ घेऊ शकता.