Credit Score : आपल्या अनेक कामांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो. यामुळे अपल्याला आर्थिक पाठबळ मिळते. मात्र आता बँकेने आपल्या नियमामध्ये मोठा बदल केला असून, जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल तर तुम्हाला कर्ज घेणे थोडे अवघड जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल.
ट्रान्समिशन CIBIL डेटानुसार, 2021 आणि 2022 च्या जून तिमाहीत 29 टक्के नवीन कर्ज अर्ज बँकांनी मंजूर केले आहेत. तर 2023 मध्ये हा आकडा 23 टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच गेल्या वर्षभरात बँकांकडून ५ टक्के कमी नवीन कर्ज मंजूर करण्यात आले आहे.
जूनच्या डेटामध्ये क्रेडिट स्कोअर असलेल्या लोकांसाठी कर्ज मंजूरीमध्येही थोडीशी घट झाली आहे. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे, गृहकर्ज, मालमत्ता तारण, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्जाच्या सर्व श्रेणींमध्ये नवीन क्रेडिट मंजूरींमध्ये घट झाली आहे.
दरम्यान, जेव्हा एखादी व्यक्ती बँकेत कर्जासाठी अर्ज करते तेव्हा बँक प्रथम त्या व्यक्तीची क्रेडिट हिस्ट्री तपासते. अशा परिस्थितीत जेव्हा बँकेला एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट हिस्ट्री मिळत नाही आणि परतफेडीबाबत खात्री नसते. तेव्हा अश्यावेळी बँक कर्ज देण्याचा विचार करत नाही. कारण तुमचा CIBIL स्कोर हा झिरो असतो. यामुळे तुम्हाला कर्ज मिळणे अवघड ठरते.
नवीन कर्जांच्या मंजुरीतील घट हे देखील दर्शविते की जोखीम कमी ठेवण्यासाठी बँकांनी नियम पूर्वीपेक्षा कडक केले आहेत. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा जेव्हा एखादी बँक आपली जोखीम कमी करण्यासाठी कर्जाचे नियम पडताळते, तेव्हा ते प्रथम क्रेडिट हिस्ट्री नसलेल्या लोकांवर परिणाम करते. कारण त्यांची कोणत्याही प्रकारची हिस्ट्री नसल्यामुळे त्यांना कर्ज देने बँकेला सुरक्षित वाटत नाही.
आकडेवारीनुसार, संस्थांमध्ये नवीन क्रेडिट घेणाऱ्या ग्राहकांचा स्टॉक या एप्रिल-जून महिन्यांमध्ये 4 टक्क्यांनी घसरून 15 टक्क्यांवर आला आहे. तर प्राइम आणि त्यावरील ग्राहकांचा शेयर ६ टक्क्यांनी वाढला आहे. यामुळे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर आधी आपली हिस्ती नक्की पाहावी.