सोन्याच्या किमतीत मोठी घसरण ! 2 जून रोजी 10 ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतात ?

सोन खरेदीसाठी सराफा बाजारात जाणार आहात का ? मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. खरंतर आज पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे आणि अशा परिस्थितीत आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत.

Updated on -

Gold Price Today : सोन्याची किंमत दोन दिवस स्थिर होती. 31 मे 2025 आणि 1 जून 2025 रोजी सोन्याची किंमत स्थिर राहिली. मात्र आता या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

गत दहा दिवसांच्या काळात या मौल्यवान धातूच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत असून यामुळे गुंतवणूकदार हैराण झाले आहेत सोबतच ग्राहकांमध्येही मोठ्या प्रमाणात संभ्रमाची स्थिती पाहायला मिळत आहे. लग्नसराई अंतिम टप्प्यात आली आहे पण तरीही अनेक जण सोन खरेदीच्या तयारीत आहेत आणि अशा या स्थितीत सोन्याच्या किमतीत होणारी चढ-उतार ग्राहकांची डोकेदुखी वाढवत आहे.

दरम्यान जर तुम्हालाही सोन खरेदी करायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. आज आपण दोन जून 2025 रोजी दहा ग्रॅम सोने खरेदीसाठी किती पैसे मोजावे लागतात? आजचे राज्यातील 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे रेट कसे आहेत याचा आढावा जाणून घेणार आहोत.

मुंबई, पुणे आणि नागपूर मध्ये सोन्याचे भाव कसे आहेत ? 

देशाची आर्थिक राजधानी मुंबई, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि उपराजधानी नागपूर या प्रमुख शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

नाशिक, वसई विरार, लातूर आणि भिवंडी शहरातील सोन्याचे भाव कसे आहेत?

मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्यातील नाशिक, वसई विरार, लातूर आणि भिवंडी या प्रमुख शहरांमध्ये 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. 31 मे आणि एक जून 2025 रोजी या शहरांमध्ये सोन्याच्या किमती स्थिर होत्या मात्र आज यात थोडी घसरण झाली आहे.

जळगाव, कोल्हापूर आणि ठाण्यात सोन्याचे भाव कसे आहेत ?

सुवर्णनगरी जळगाव, कोल्हापूर आणि ठाणे या तीन शहरांमध्ये आज 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 980 रुपये प्रति दहा ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याची किंमत 89,190 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 97 हजार 300 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe