7th Pay Commission : HRA बाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच होणार लागू ..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, येत्या काही दिवसांमध्ये HRA वाढीची आनंदाची बातमी मिळेल. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरेल. दरम्यान, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या घर भत्ता भाड्यात म्हणजेच एचआरएमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर जाणून घ्या कधी मिळेल HRA वाढ.

गेल्या महिन्यात, नवरात्री दरम्यान, केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) 4% वाढ जाहीर केली. या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांचा भत्ता आता ४२% वरून ४६% झाला आहे. यानंतर आता केंद्रीय कर्मचारी त्यांच्या घर भत्ता भाड्यात म्हणजेच एचआरएमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत.

सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीत एचआरएसाठी काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे सादर करण्यात आली आहेत. यानुसार, जेव्हा महागाई भत्ता म्हणजेच डीए 50 टक्के किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा एचआरएमध्येही सुधारणा केली जाईल. एचआरए वाढीसाठी शहरांची तीन श्रेणींमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, यासाठी X, Y आणि Z या श्रेणी देण्यात आल्या आहेत. जर कर्मचारी X श्रेणीतील शहरे/नगरांमध्ये राहत असेल तर त्याचा HRA 30 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्याचप्रमाणे Y श्रेणीसाठी HRA दर 20 टक्के आणि Z श्रेणीसाठी 10 टक्के असा वाढणार आहे.

दरम्यान, सध्या डीए दर 50 टक्क्यांच्या खाली आहे. तर अशा स्थितीत X, Y आणि Z या शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 27, 18 आणि 9 टक्के HRA मिळणार आहे.

दरम्यान, सर्व प्रक्रिया नीट पार पडली तर तर नवीन वर्षाच्या पहिल्या सहामाहीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना HRA वाढीची आनंदाची बातमी मिळेल. असा अंदाज आपण लावू शकतो. दरम्यान, सध्या डीए 46 टक्के आहे आणि असा अंदाज आहे की सरकार 2024 च्या पहिल्या सहामाहीसाठी डीए 4 टक्क्यांनी वाढवेल.

दरम्यान, असे झाल्यास डीए ५० टक्क्यांपर्यंत वाढेल. म्हणजेच ५० टक्के डीएसोबतच कर्मचाऱ्यांचा एचआरएही वाढणार आहे. पहिल्या सहामाहीत DA 3 टक्क्यांनी वाढला, तर दुसऱ्या सहामाहीत तो 50 टक्के पातळी ओलांडेल. म्हणजेच 2024 मध्ये कर्मचाऱ्यांना HRA बाबत चांगली बातमी मिळेल.