अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- बर्याचदा जुन्या ठिकाणाहून सोनं किंवा किमती वस्तू सापडण्याच्या अनेक बातम्या समोर येत असतात. काही काळापूर्वी गुजरातमधील खेड्याबाहेर सोन्याचे तुकडे सापडल्याची बातमी समोर आली होती.
आता आणखी प्रकरण समोर आले आहे. ही घटना तामिळनाडूची आहे, जिथे मंदिर नूतनीकरणाच्या वेळी ‘प्राचीन सोने’ सापडले आहे. या प्राचीन सोन्यापासून बनवलेल्या काही वस्तू आहेत. तामिळनाडूतील एका गावात मंदिर स्वच्छ करण्याचे काम चालू होते, की अचानक लोकांच्या हाताला सोने लागले. चला संपूर्ण प्रकरण काय आहे ते जाणून घेऊया.
गावकरी विरोध करत आहेत :- एनडीटीव्हीच्या अहवालानुसार अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते घटनास्थळी पोहोचले आणि सोने जप्त केले. त्याचबरोबर ते सरकारी तिजोरीत जमा झाले आहे. परंतु स्थानिकांनि सोने जप्त करण्यास विरोध केला. गावकरी स्वतः शिव मंदिराचे नूतनीकरण करत होते. यावेळी त्यांना मंदिराच्या पायऱ्यांखाली सोन्याच्या वस्तू सापडल्या, ज्याचे वजन अर्धा किलोपेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते. या पायर्या मंदिराच्या गुप्त खोलीकडे जातात.
ग्रामस्थांना ते सोने पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचे होते :- खजिन्याची माहिती मिळताच अधिकारी मंदिरात पोहोचले. ते सरकारकडे देण्यास तयार होते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर जिथून सोने निघाले होते तेथे त्याच ठिकाणी सोने ठेवण्याची इच्छा असल्यामुळे भाविक आणि स्थानिकांनि सोने जप्त करण्यास विरोध केला. दोन्ही बाजूंनी चर्चा झाली. पण हे संभाषण अयशस्वी ठरले, त्यानंतर अधिकाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले.
अधिकारी घेऊन गेले सोने :- विरोधाच्या वेळी अधिकाऱ्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. पोलिस आले, त्यानंतर अधिकाऱ्यांनी हा खजिना ताब्यात घेतला आणि एका बॉक्समध्ये सील करून ते आपल्याबरोबर घेऊन गेले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर चोल काळामधील असल्याचे मानले जाते. एका गावकऱ्याच्या म्हणण्यानुसार मंदिराच्या पायऱ्यांखाली थोडेसे सोने ठेवणे शुभ मानले जाते आणि ही प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे.
वजन सुमारे 565 ग्रॅम आहे :- एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की सोन्याचे वजन माहितीनुसार “565 ग्रॅम” आहे आणि ते मंदिरात परत आणायचे की नाही याबाबत सरकारी महसूल अधिकारी निर्णय घेतील. सध्या ते सरकारी तिजोरीत जमा झाले आहे.