Categories: आर्थिक

मोठी बातमी ! सौदी अरेबियाने पेट्रोल डिझेलबाबत घेतला ‘हा’मोठा निर्णय, भारतावर होणार ‘हा’ परिणाम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवत आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सध्या राज्यात पेट्रोलने जवळपास नव्वदी पार केली आहे.

कोरोनानंतर अर्थव्यवस्था सुधारण्याच्या वेगाने कच्च्या तेलात मागणीत झालेली वाढ यानेच महत्वाचे कारण आहे. मात्र, आता सौदी अरेबियाने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतलाय. सौदी अरेबियाच्या नेतृत्वातील खनिज तेल उत्पादक देशांची संघटना ओपेकने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे याचा भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. या आठवड्यात सौदी अरेबियाने कच्चा तेलाच्या उत्पादनात प्रतिदिन 10 लाख बॅरलची कपात केलीय. दुसरीकडे ओपेक संघटनेच्या सदस्य देशांनी 97 लाख बॅरल कच्च्या तेलाचं उत्पादन कमी करण्याचं जाहीर केलंय. त्यामुळे भारताला मोठा फटका बसणार आहे.

भारताची कच्च्या तेलाची गरज मोठी आहे. अमेरिका आणि चीननंतर कच्चा तेलाचा ग्राहक देश म्हणून भारताचा तिसरा क्रमांक लागतो. त्यातच भारताला आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी एकूण 80 टक्के गरज आयातीतून भागवावी लागते.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतींचा भारतावर थेट परिणाम होतो. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका भारताला बसेल.

 किंमत निश्चित करण्याचा हा आहे आधार :- परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात. या मानकांच्या आधारे तेल कंपन्या दररोज पेट्रोल दर आणि डिझेल दर निश्चित करण्याचे काम करतात.

घरबसल्या ‘असे’ जाणून घ्या डिझेल व पेट्रोचे दर :- तेल विपणन कंपन्या दरांचा आढावा घेतल्यानंतर दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेल दरात बदल करतात.

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील जाणून घेऊ शकता. यासाठी इंडियन ऑईल ग्राहक आरएसपी स्पेस पेट्रोल पंपचा कोड लिहून 9292992249 आणि बीपीसीएल ग्राहक आरएसपी 9223112222 वर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, एचपीसीएल ग्राहक 9222201122 क्रमांकावर ‘एचपीप्राइस’ लिहून आजची किंमत जाणून घेऊ शकतात.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24