Categories: आर्थिक

मोठी बातमी ! सरकार ‘ह्या’ मुलांना दर महिन्याला देणार 2 हजार रुपये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

चाइल्ड केयर इंस्टीट्यूशन (CCI) चे जी मुले कोरोना साथीच्या आजारामुळे आपल्या कुटुंबासमवेत राहत आहेत अशा मुलांना शिक्षणासाठी दरमहा दोन हजार रुपये दिले जातील. सर्वोच्च कोर्टाने मंगळवारी सर्व राज्यांसाठी त्यासंदर्भात एक आदेश जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार आता सीसीआयच्या प्रत्येक मुलाला शिक्षणासाठी दरमहा दोन हजार रुपये मिळतील. याशिवाय सीसीआयला पुस्तके आणि स्टेशनरीसारख्या आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना दिले आहेत.

न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सीसीआयमधील सर्व मुलांना शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध आहेत याची काळजी घ्यावी, असेही राज्यांना सांगितले आहे. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी हे देखील खंडपीठावर होते.

 निम्म्याहून अधिक मुले कुटुंबासह किंवा पालकांसमवेत आहेत :- कोरोना साथीच्या सुरूवातीस, सीसीआयमध्ये 2,27,518 मुले होती आणि 1,45,788 मुले आता त्यांच्या कुटूंबात किंवा पालकांसमवेत आहेत. आता राज्य अशा मुलांना दरमहा 2 हजार रुपये देईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही रक्कम मुलांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा बाल संरक्षण युनिटच्या शिफारशीनुसार देण्यात येणार आहे.

डिस्ट्रिक्ट चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट्स ठेवेल लक्ष :- आपल्या कुटूंबियांसह राहणाऱ्या मुलांना शिक्षण देण्याचे महत्त्व ओळखून खंडपीठाने जिल्हा बाल संरक्षण संघटनांचे समन्वय साधून प्रगतीवर नजर ठेवण्याचे निर्देश दिले. या व्यतिरिक्त, या युनिट्स जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला मुलांना शिक्षण देण्यामध्ये किती प्रगती झाली याबद्दल संपूर्ण माहिती देतील.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24