Google Pay : Google Pay वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे पाठवण्यासाठी Google Pay चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण आता Google Pay ने आपल्या लाखो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. Google Pay आता प्रत्येक मोबाइल रिचार्जवर 3 रुपये जास्तीचे आकारणार आहे. पूर्वी PhonePe आणि Paytm कडून हे शुल्क आकारले जात होते. मात्र आता Google Pay देखील ग्राहकांकडून व्यवहार शुल्क आकारणार आहे.
माहितीनुसार, जे ग्राहक त्यांच्या फोनसाठी प्रीपेड रिचार्ज करतात त्यांच्याकडून Google हे शुल्क आकारेल. यापूर्वी गुगल पेकडून कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते, मात्र आता गुगलने आपल्या धोरणात बदल केला आहे. अशी बातमी असली तरी देखील गुगलकडून याबाबत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. यासाठी असा नियम असू शकतो की, तुम्ही 100 रुपयांपेक्षा कमी रिचार्ज केल्यास तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
पेटीएम, PhonePe आधीच शुल्क आकारत आहे
सध्या पेटीएम, फोन पे प्रत्येक रिचार्जवर ट्रान्झॅक्शन फी आकारत आहे. म्हणूनच गुगल पेने त्यांचे नियम बदलणे आवश्यक होते. एका अहवालानुसार, 100 ते 400 रुपयांपर्यंतच्या व्यवहारांसाठी प्रति वापरकर्ता 2 रुपये आकारले जातील. 300 रुपयांचे रिचार्ज सलग 3 वेळा केल्यास व्यवहार शुल्क 3 रुपये असेल.
या व्यतिरिक्त जर आपण एका अहवालाबद्दल बोललो तर, जेव्हा जेव्हा वापरकर्ते त्यांचा प्रीपेड नंबर रिचार्ज करतात तेव्हा त्यांना या व्यवहार शुल्काची माहिती दिली जाते. दरम्यान, गुगलनेही आपल्या भारतीय ग्राहकांसाठी ॲपमध्ये बदल केले आहेत, परंतु हे बदल 10 नोव्हेंबरच्या अपडेटमध्ये समाविष्ट आहेत की नाही याबद्दल काहीही सांगता येणार नाही. प्रत्येक व्यवहारापूर्वी ग्राहकांना त्यांच्या फीबद्दल माहिती दिली जाईल असेही अहवालात सुचवले आहे.