२३ जानेवारी २०२५ मुंबई : गेल्या काही दशकांमध्ये भारत कृषीप्रधान अर्थव्यवस्थेपासून सेवा आणि उत्पादन क्षेत्रात जागतिक शक्ती म्हणून विकसित झाला आहे. तरुण लोकसंख्या, जलद शहरीकरण, तांत्रिक प्रगती आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या विकासामुळे हे परिवर्तन घडत आहे. आर्थिक वाढीचा शेअर बाजारावर खोलवर परिणाम झाला आहे. निफ्टी ५० सारखे निर्देशांक सातत्याने नवीन उच्चांक गाठत आहेत, ज्याद्वारे देशाची क्षमता आणि गुंतवणूकदारांचा विश्वास दिसून येत आहे.
२०१० ते २०२४ पर्यंत निफ्टी ५० चा चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) सुमारे ११.८५ टक्के आहे. या वाढीला मजबूत कॉर्पोरेट उत्पन्न, अनुकूल सरकारी धोरणे आणि किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या सहभागामुळे पाठिंबा मिळाला आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी) मुळे शेअर बाजारात नियमितपणे गुंतवणूक करणे सोपे झाले आहे, ज्यामुळे एकूण बाजारवाढीला हातभार लागला आहे. मल्टीकॅप फंडांनी गुंतवणूकदारांना संतुलित जोखीम- परतावा दिल्याचे डेटा दर्शवतो.
अॅक्सिस मल्टीकॅप फंडने तीन वर्षांत २०.४० टक्क्यांचा सीएजीआर परतावा दिला आहे.त्याने सातत्याने त्याच्या बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.याच कालावधीत बिर्ला मल्टीकॅपने १२.६४ टक्के आणि एचडीएफसीने १९.९३ टक्के परतावा दिला आहे. अॅक्सिस ब्लूचिप फंडने त्यांच्या बेंचमार्कपेक्षा चांगली कामगिरी केली आहे आणि १५ वर्षांत १२.४८ टक्क्यांचा सातत्यपूर्ण सीएजीआर परतावा दिला आहे.
हा फंड गुंतवणूकदारांना स्थिरता आणि वाढीची क्षमता मिळवून देण्यासाठी उच्च गुणवत्तेच्या लार्ज कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.कर वाचवण्यासाठी इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ईएलएसएस) फंड हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेला अॅक्सिस ईएसजी इंटिग्रेशन स्ट्रॅटेजी फंडचे मजबूत ईएसजी पद्धती असलेल्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित असून सुरुवातीपासूनच या फंडाने १६.६६ टक्क्यांच्या सीएजीआरने परतावा दिला आहे. कमी जोखीम आणि कमी गुंतवणूक कालावधीत स्थिर परतावा मिळवू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कमी कालावधीचा फंड हा एक आदर्श पर्याय असू शकतो. हे फंड प्रामुख्याने कर्ज आणि चलन बाजारातील साधनांमध्ये गुंतवणूक करतात, ज्यांची मुदत एक ते तीन वर्षांपर्यंत असते. १५ वर्षे पूर्ण केलेल्या अॅक्सिस शॉर्ट ड्युरेशन फंडाने स्थापनेपासून ७.५१ टक्क्यांचा सीएजीआर परतावा दिला आहे.