BOB Fd Scheme:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असून बहुसंख्य नागरिक किंवा गुंतवणूकदार हे गुंतवणुकीसाठी विविध बँकांच्या मुदत ठेवी योजना आणि पोस्ट ऑफिस व अनेक सरकारी योजनांचा पर्याय निवडतात. कारण कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करताना त्याची गुंतवणुकीची सुरक्षितता आणि गुंतवणुकीतून मिळणारा परतावा या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्यायांची निवड करत असतो.
परंतु यामध्ये बहुतांशी पसंती ही बँकांच्या मुदत ठेव योजनांना दिली जाते. या अनुषंगाने बँकांच्या माध्यमातून देखील आकर्षक व्याजदरावर विविध प्रकारच्या एफडी योजना सादर केल्या जातात व अशाच प्रकारे बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून एक नवीन विशेष मुदत ठेव योजना सुरू करण्यात आलेली असून ही सुपर स्पेशल नावाची एफडी योजना आहे. याच विशेष मुदत ठेव योजनेची माहिती या लेखात आपण घेऊ.
कशी आहे बँक ऑफ इंडियाची सुपर स्पेशल एफडी योजना?
बँक ऑफ इंडियाची ही एक नवीन विशेष एफडी योजना असून ती नुकतीच बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे व या एफडी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना वार्षिक 7.50% व्याजाचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे हे व्याज 2 ते 50 कोटी रुपयांच्या मुदत ठेवीवर दिले जात आहे.
या एफडी योजनेचा मॅच्युरिटी म्हणजेच परिपक्वता कालावधी 175 दिवसांचा असून या स्पेशल मुदत ठेव योजनेची सुरुवात बँकेच्या माध्यमातून एक जानेवारी 2024 पासून करण्यात आली आहे. बँक ऑफ इंडियाची ही मुदत ठेव योजना खास करून उच्च उत्पन्न गटासाठी ऑफर केली जात असून या योजनेचा लाभ कार्पोरेट्सना देखील दिला जात आहे.
या मुदत योजनेच्या माध्यमातून कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त व्याज देण्यात येत आहे. म्हणजेच 175 दिवसाच्या मुदत ठेवीवर 7.50% वार्षिक व्याज या माध्यमातून मिळणार असून कमी कालावधीत दिलेले जास्तीत जास्त हा व्याजाचा दर आहे.
तसेच या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे जर गुंतवणूकदार साठ वर्षावरील व 80 वर्षापेक्षा कमी वयाचे असतील तर अशा ज्येष्ठ नागरिकांना 0.50% अतिरिक्त व्याजाचा लाभ दिला जात आहे.
एवढेच नाहीतर बँक ऑफ इंडिया सात दिवस ते दहा वर्षापर्यंतची बल्क मुदत ठेवीमध्ये देखील गुंतवणुकीचे संधी देत आहे. या कालावधी करिता बँकेच्या माध्यमातून 4.50% ते 6% पर्यंत व्याज मिळणार आहे व बल्क मुदत ठेवीवर जास्तीत जास्त सात पण पंचवीस टक्के इतके व्याज देण्यात येणार आहे.
बँक ऑफ इंडियाचे बल्क एफडी वरील व्याजदर
1- सात दिवस ते 14 दिवस– व्याजाचा दर 4.50% व जेष्ठ नागरिकांसाठी 4.50%
2- पंधरा दिवस
ते 30 दिवस– सामान्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50%3- 31 दिवस ते 45 दिवस– सामान्य लोकांसाठी 4.50% तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 4.50%
4- 64 दिवस ते 90 दिवस– सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 5.25%
5- 91 दिवस 179 दिवस– सामान्य आणि जेष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के
6- 180 ते 210 दिवस– सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.25%
7- 211 ते 279 दिवस– सामान्य व ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50%
8- 270 दिवस ते एक वर्षापर्यंत कमी– सामान्य व जेष्ठ नागरिकांसाठी 6.50%
9- एक वर्ष कालावधी
करिता– सामान्य ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.25%10- एक वर्षापेक्षा जास्त आणि दोन वर्षापेक्षा कमी– सामान्य व ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.75%
11- दोन वर्ष कालावधी करिता– सामान्य व ज्येष्ठ नागरिकांकरिता 6.50%
12- दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी– सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 6.50%
13- तीन वर्षांपेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी– सामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के
14- पाच वर्षापेक्षा जास्त आणि आठ वर्षापेक्षा कमी– सामान्य व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहा टक्के
अशाप्रकारे साधारणपणे व्याजदर दिले जात आहेत.