Top Share:- डिसेंबर तिमाहीच्या आर्थिक अहवालानंतर बाजारात सकारात्मकता दिसून येत आहे. चांगल्या बजेट आणि आरबीआयच्या रेपो रेट कपातीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत आहे. तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा अल्पावधीसाठी बाजारावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर कंपन्यांचे तिमाही निकाल महत्त्वाचे ठरत आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकरेज फर्मने डिसेंबर 2024 तिमाही निकालांच्या विश्लेषणानंतर आठ शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. या शेअर्समध्ये आगामी 12 महिन्यांत 40 टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो.

ब्रोकरेजने दिलेली टार्गेट प्राईस
इंडसइंड बँक
ब्रोकरेजने खाजगी बँक इंडसइंड बँकेसाठी खरेदीची शिफारस दिली असून या शेअरसाठी 1350 रुपयांचे लक्ष्य ठरवले आहे. सध्या हा शेअर 1079.40 रुपयांवर असून यात 25 टक्के वाढ होऊ शकते. बँकेच्या डिसेंबर तिमाहीतील आर्थिक कामगिरीनुसार वार्षिक कर्ज वितरण 12.02 टक्क्यांनी वाढून 366889 कोटी रुपये झाले असून कॉर्पोरेट कर्जातही 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
केईसी इंटरनॅशनल कंपनी
नागरी बांधकाम क्षेत्रातील केईसी इंटरनॅशनल कंपनीलाही ब्रोकरेजने ‘बाय’ रेटिंग दिले आहे. सध्या या शेअरची किंमत 827.10 रुपये असून प्रति शेअर 1000 रुपये लक्ष्य ठेवण्यात आले आहे. सध्याच्या किमतीच्या तुलनेत 20.90 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात 7 टक्क्यांची वाढ झाली आहे, असे ब्रोकरेज अहवालात नमूद करण्यात आले आहे.
टाटा कंजूमर प्रॉडक्ट
टाटा ग्रुपच्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सलाही खरेदीसाठी शिफारस करण्यात आली आहे. सध्या या शेअरची किंमत 1021.65 रुपये असून, त्यासाठी 1225 रुपये लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यामध्ये 19.90 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. कंपनीचा एकत्रित महसूल तिसऱ्या आर्थिक वर्षात 17 टक्क्यांनी वाढून 4444 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ज्यात भारतीय वस्तू क्षेत्रात 9 टक्के आणि अन्नपदार्थांमध्ये 11 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.
कजारिया सिरॅमिक्स
सिरेमिक्स क्षेत्रातील कजारिया सिरेमिक्सच्या शेअरसाठी ब्रोकरेजने 1150 रुपयांचे लक्ष्य ठेवले असून सध्या हा शेअर 970.95 रुपयांवर व्यवहार करत आहे. यामध्ये 18.44 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. टाइल्स विक्रीत 7 टक्क्यांची वाढ झाली असून महसूल 2.8 टक्क्यांनी वाढला आहे.
मारुती सुझुकी इंडिया
देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाच्या शेअरसाठी ब्रोकरेजने 15400 रुपयांचे लक्ष्य दिले आहे. सध्या हा शेअर 13046.60 रुपयांवर असून, 18 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 13 टक्क्यांची वाढ झाली असून, विक्रीचा आकडा 5.66 लाख युनिट्सपर्यंत पोहोचला आहे.