आर्थिक

Jio आणि Airtel चा गेम ओवर! BSNL ने आणला जबरदस्त स्वस्त रिचार्ज प्लान!

Published by
Ratnakar Ashok Patil

BSNL Recharge Plan:- सध्या टेलिकॉम क्षेत्रात प्रचंड स्पर्धा सुरू असून अनेक खाजगी कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर्स देत आहेत. मात्र या कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स दिवसेंदिवस महाग होत आहेत.त्यामुळे सामान्य ग्राहकांसाठी परवडणारा पर्याय शोधणे गरजेचे बनले आहे.

अशाच ग्राहकांसाठी भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने एक नवीन स्वस्त आणि दीर्घकालीन वैधतेचा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे.जो खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत खूपच फायदेशीर ठरू शकतो.

१० महिन्यांची व्हॅलिडीटी असलेला प्लॅन

बीएसएनएलच्या या नवीन प्लॅनची सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे त्याची दीर्घकालीन वैधता म्हणजेच व्हॅलिडीटी होय. केवळ एकदाच रिचार्ज करून तब्बल ३०० दिवसांपर्यंत तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय बीएसएनएलच्या सेवा वापरू शकता. अनेक ग्राहकांना दरमहा रिचार्ज करण्याचा त्रास टाळायचा असतो व अशांसाठी हा प्लॅन एकदम योग्य पर्याय ठरू शकतो.

७९७ रुपयांत अमर्यादित कॉलिंग आणि इंटरनेट

बीएसएनएलच्या ७९७ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय इंटरनेट वापरासाठीही पुरेसा डेटा मिळतो.

विशेषतः ड्युअल सिम वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन अत्यंत उपयुक्त आहे. जर तुम्ही बीएसएनएलचा सिम सेकंडरी सिम म्हणून वापरत असाल तर हा प्लॅन तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो.

इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त रिचार्ज प्लॅन

सध्या जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लॅन्स तुलनेने महागडे आहेत. या कंपन्यांचे बहुतेक प्लॅन्स महिन्याभरासाठीच असतात आणि त्यानंतर पुन्हा रिचार्ज करावा लागतो.

मात्र बीएसएनएलचा ७९७ रुपयांचा प्लॅन संपूर्ण १० महिन्यांसाठी वैध असल्यामुळे ग्राहकांना पुन्हा-पुन्हा रिचार्ज करण्याची गरज भासत नाही.

या प्लॅनचे फायदे
३०० दिवसांची व्हॅलिडीटी मिळते व एकदाच रिचार्ज केल्यावर जवळपास १० महिने पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही.तसेच देशभरात कुठेही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते व इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांसाठी पुरेसा डेटा उपलब्ध होतो.

त्यामुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया यांच्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकालीन सेवा देणारा प्लान आहे. हा रिचार्ज प्लान ड्युअल सिम वापरकर्त्यांसाठी योग्य असून ज्यांच्याकडे दुसरा नंबर आहे त्यांच्यासाठी कमी खर्चात उत्तम पर्याय यामुळे निर्माण झाला आहे.

Ratnakar Ashok Patil