Business Idea : अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. मोठं-मोठ्या कंपन्यादेखील आपल्या कामगारांना घरचा रस्ता दाखवत आहेत. त्यामुळे नोकरी नसल्याने अनेकांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. जर तुम्हालाही नोकरीचे टेन्शन असेल तर काळजी करू नका.
आता तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता. विशेष म्हणजे जर तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल कमी असेल तर तुम्हाला सरकार मदत करेल. तुम्ही आता संपूर्ण वर्षभर मागणी असणारा व्यवसाय सुरु करू शकता.
असा सुरु करा हा व्यवसाय
तुमच्या गावात नक्कीच एखादी ऑईल मिल असेल. ज्यात मोहरीपासून तेल काढले जाते. हा व्यवसाय आता लहान स्तरावर सुरू केला जाऊ शकतो. पूर्वी मोहरीचे तेल काढण्यासाठी मोठं मोठी यंत्रे लावावी लागत होती. परंतु आता बाजारात अनेक छोटी मशिन्सही आली आहेत. ज्याची किंमत खूप कमी आहे आणि त्यांना स्थापित करण्यासाठी जास्त जागेची गरजदेखील पडत नाही. इतकेच नाही तर त्यांना चालवण्यासाठी जास्त कष्टही घ्यावे लागत नाहीत.
व्यवसायासाठी किती येईल खर्च?
सर्वात अगोदर तुम्हाला ऑइल एक्सपेलर मशीन खरेदी करावी लागणार आहे. किमतीचा विचार केला तर या मशीनची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे. यानंतर तेल मिल उभारण्यासाठी FSSAI कडून तुम्हाला परवाना देखील घ्यावा लागणार आहे. तसेच तुम्हाला नोंदणीही करावी लागणार आहे. समजा जर तुम्ही या प्रक्रियेचे पालन केले नाही तर तुमचा व्यवसाय बेकायदेशीर मानला जाऊ शकतो. याच्या संपूर्ण सेटअपसाठी तुम्हाला एकूण 3-4 लाख रुपये खर्च येऊ शकतो.
समजा जर तुम्ही हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरु केला तर तर खर्चात देखील थोडी वाढ होऊ शकते. या यंत्रामध्ये बिया एकत्र करून दाबून तेल काढण्यात येते. अशा परिस्थितीत तेल आणि केक वेगळेवेगळे होत असतात. सर्वात आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला केक विकून देखील पैसे मिळू शकतात. केक प्राण्यांना खायला देण्यात येतो.
किती होईल कमाई?
आता तुम्ही तेल बाजारात पोहोचवण्यासाठी ऑनलाइन मार्केटिंगचीदेखील मदत घेऊ शकता. या तेलाची टिन किंवा बाटल्यांमध्ये पॅक करून विक्री करता येते. या व्यवसायात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. यानंतर, तुम्ही अनेक वर्षानुवर्षे बंपर उत्पन्न मिळवू शकता. तुमचा खर्च देखील काही महिन्यांत संपूर्ण निघू शकतो. हे लक्षात ठेवा की या व्यवसायात तुमचे नुकसान होण्याची शक्यता खूपच कमी आहे.