Business Idea : कमी मेहनत आणि कमी गुंतवणुकीत महिन्याला करा हजारोंची कमाई! आजच सुरु करा ‘हा’ शानदार व्यवसाय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : नोकरीत पाहिजे तशी कमाई करता येत नसल्याने अनेकजण व्यवसाय करू लागले आहेत. अनेकांना व्यवसाय सुरु करायचा असतो परंतु त्यात जास्त मेहनत घेऊ वाटत नाही. जर तुम्हालाही कमी मेहनतीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

कारण आता तुम्ही कमी कष्टात आणि कमी कमी गुंतवणुकीत महिन्याला करा हजारोंची कमाई होणारा व्यवसाय सुरु करू शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही हा व्यवसाय घरीच बसून सुरु करू शकता. कसे ते पहा.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे मशरूमची शेती करणे जेवढे सोपे आहे, तेवढे त्यातून नफा मिळवणे देखील सोपे आहे. आनंदाची बाब म्हणजे तुम्हाला अवघ्या 3-4 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत आणि 10 x 10 फूट आकाराच्या खोलीत हा व्यवसाय सुरू करता येईल.

तसेच आता देशातील जवळपास सर्व मध्यम आणि मोठ्या शहरांमध्ये असणाऱ्या सरकारी कृषी संस्थांमधून तुम्हाला त्याच्या लागवडीचे मोफत प्रशिक्षण घेता येईल. त्यामुळे तुम्हाला मशरूम वाढवण्यापासून ते कुठे विकायचे याची माहिती मिळेल.

लागतील या वस्तू

सर्वात आवश्यक वस्तू म्हणजे एक छोटी खोली. या खोलीमध्ये बांबू आणि स्प्लिंटर्सच्या साहाय्याने बहुस्तरीय प्लॅटफॉर्म तयार करण्यात येतो. पेंढा, कंपोस्ट खत आणि इतर काही गोष्टी मिसळून मशरूम लागवडीसाठी आवश्यक ते साहित्य केले जाते. त्यानंतर ते पाण्याने चांगले भिजवून प्लास्टिकच्या मोठ्या पिशव्यांमध्ये भरून या प्लॅटफॉर्मवर ठेवण्यात येते. यासाठी एकूण 3000 ते 5000 रुपये इतका खर्च येतो. जर तुम्हाला मोठा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही ते करू शकता.

विविध ठिकाणी छिद्रे करून त्या बिया पिशव्यांमध्ये टाकण्यात येतात. खोलीमधील वातावरण गडद ठेवण्यात येते. त्याचे पीक सुमारे तीन ते चार आठवड्यांत तयार होते. हे मशरूम पॅक करून बाजारात विकले जाते. पहिल्या कापणीनंतर, तुमहाला दर 7 ते 15 दिवसांनी कापणी करता येते. परंतु तुम्हाला फक्त एकच काळजी घ्यावी लागणार आहे ती म्हणजे त्या खोलीत ओलसर आणि गडद वातावरण असावे.

यातील सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला जास्त काळजी घ्यावी लागत नाही. एकदा पूर्ण सेटअप तयार करून दर 2 ते 3 दिवसांनी पाणी शिंपडत राहा ज्यामुळे ओलावा टिकून राहू शकतो. तसेच आठवड्यातून एकदा बुरशीची तपासणी करा. मशरूम विषारी होणार नाहीत.

कमाई

किमतीचा विचार केला तर बाजारामध्ये मशरूमची किंमत 150 ते 500 रुपये किलो आहे. हे लक्षात घ्या की किंमत त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. 10 x 10 फूट खोलीत शेती करून तुम्ही प्रत्येक महिन्याला हजारो रुपयांची कमाई करू शकता. एकदा सेटअप तयार झाल्यानंतर, तुम्ही तो एकूण 3 महिने कमवू शकता. समजा जर तुम्हाला जास्तीत जास्त नफा कमवायचा असेल तर मशरूम विकण्याऐवजी त्यापासून बनवलेले पदार्थ विका. उदाहरणार्थ, मशरूमचे लोणचे, पावडर, पापड इ. तर तुम्हाला तिप्पट फायदा होऊ शकतो.