आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात व शासनाच्या मेक इन इंडियाच्या संकल्पनेच्या दुनियेत तुम्हाला बिझनेस करण्यामध्ये मोठी संधी आहे. व्यवसायाद्वारे तुम्ही भरपूर पैसे कमावू शकता. नोकरी करण्यात जो वेळ लागतो त्यापेक्षा निश्चितच जास्त वेळ, कष्ट व्यवसायात तुम्हाला घ्यावे लागतील परंतु त्यात तुम्हाला पैसे नोकरीच्या अनेक पटीने जास्त पैसे मिळू शकतात.
आम्ही तुम्हाला येथे एक जबरदस्त बिझनेस आयडिया देणार आहोत. तुम्ही मसाल्याचा व्यवसाय सुरु करू शकता. आजच्या फास्टफूड शैलीत हॉटेल्स, हॉटेलिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. घरगुती जेवण बनवण्याच्या पद्धतीत देखील बदल झाला आहे. त्यामुळे मसाल्याला डिमांड भरपूर वाढली आहे. त्यामुळे यातून पैसे कमावण्याची संधी भरपूर आहे. चला त्याबद्दल जाणून घेऊयात.
व्यवसाय स्टार्ट करण्या आधी करा मार्केट रिसर्च :- व्यवसाय कोणताही असो सर्वात आधी करावे लागणारे काम म्हणजे मार्केट रिसर्च. जर तुम्ही मसाल्याचा व्यवसाय सुरू करणार असाल तर सर्वप्रथम तुम्हाला मार्केट रिसर्च करावे लागणार आहे. यातून होईल असं की तुम्हाला मार्केटची गरज कळेल. ग्राहकांना काय लागते, कोणता मसाला जास्त लागतो, जे पाले मार्केट आहे त्यातील क्स्टरमर बेस कोणत्या प्रकारचा आहे आदी. यामुळे तुम्हाला तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी ठरवायला सोपे जाणार आहे.
मसाल्याच्या व्यवसायाविषयी माहिती :- तुम्हाला बिझनेस करताना तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी मोठी ठेवावी लागलं. समजा तुम्हाला मिरची, हळद इत्यादी सामान्य मसाले पॅक करून विकायचे ठरवले तर हा बिझनेस जास्त मोठा होणार नाही. यासाठी तुम्हाला काही खास मसाले तयार करावे लागतील.
आजकाल बाजारात खडा मसाला, सांभर मसाला, भाजी मसाला असे अनेक प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. तुम्ही विविध प्रकारचे मसाले तयार करू शकता. हे करताना एक खास चव तुमच्या ठेवा जेणे करून लोक याची वारंवार डिमांड करतील. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुमच्याकडे 300 चौ. 400 चौ. फूट जागा असणे गरजेचे आहे की जेथे तुम्ही व्यवसाय सुरु करू शकता.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सुमारे 4 लाख ते 5 लाख रुपये गुंतवावे लागतील. यात शेड तयार करण्यासाठी तुम्हाला सुमारे 50 हजार रुपये खर्च येईल आणि मशिनची किंमत 50 हजार रुपये पर्यंत जाऊ शकते. ऑपरेटिंग कॉस्ट सुमारे 3 लाख ते 4 लाख रुपये असेल की ज्या अंतर्गत कच्चा माल आणि कामगारांचा पगार आदी गोष्टी समाविष्ट असतील.
किती पैसे कमवाल :- या व्यवसायातील तुमचा नफा तुमच्या मसाल्यांच्या मागणीवर अवलंबून असतो. तुमच्या मसाल्यांची मागणी जास्त वाढेल तसतसा टीमचा इन्कम वाचेल.साधारण गुंतवणुकीच्या 35 टक्के मार्जिन या व्यवसायात मिळते. त्यामुळे जितका जास्त पुरवठा तितका जास्त पैसा तुम्ही कमाऊ शकता.