Business Idea : कमी गुंतवणूक आणि दुप्पट कमाई! आजच सुरु ‘हा’ व्यवसाय; कसे ते जाणून घ्या

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुम्हाला कमीत कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सध्या असे काही व्यवसाय आहेत जे तुम्ही घरी बसून सहज सुरु करू शकता. समजा तुमच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी पैसे नसतील तरीही काळजी करू नका.

या कारण आता तुम्ही सरकारी मदत घेऊन व्यवसाय सुरु करू शकता. योग्य ते नियोजन आणि मागणी असणारा व्यवसाय सुरु केला तर तुमची चांगली कमाई होईल. त्यासाठी तुम्हाला त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती असावी. कसे ते जाणून घ्या सविस्तरपणे.

समजा तुम्हाला तुमचा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करायचा असल्यास काही असे व्यवसाय आहेत ज्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल आणि अनुभव लागणार नाही. इतकेच नाही तर तुम्हाला हे सुरुवातीपासूनच हे व्यवसाय नफा देतील. जाणून घ्या

ऑनलाइन सेवा

तंत्रज्ञानाच्या काळात घरात असणाऱ्या लोकांना सर्व प्रकारच्या सुविधा मिळत आहेत. जेवणापासून ते शिक्षणापर्यंत सर्व ऑनलाइन मिळत आहे. आजकाल सेवा आधारित व्यवसायाची मागणीत वाढ होत आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रीशियन, वेबसाइट डिझायनर किंवा इतर कोणत्याही कामाची समज असल्यास ज्याची लोकांना दैनंदिन जीवनात जास्त गरज असते, तर तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता.

फळांच्या रसाचा व्यवसाय

हा एक यशस्वी लघु व्यवसाय आहे. विशेष म्हणजे तो कमी भांडवलात आणि छोट्या दुकानात सुरू करता येतो. सध्या शहरांच्या कानाकोपऱ्यात ज्यूसची दुकाने आहेत. प्रत्येक दुकानावर ग्राहकांची गर्दी असते.

डे केअर सेवा

देशात नोकरदार महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे आता विवाहित महिलांना मुलांना कार्यालयात घेऊन जाणे अवघड झाले आहे. कार्यालयात अजूनही चाइल्ड कॅरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे नोकरदार महिलांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेऊन डे केअर सेवेची मागणी वाढत आहे.

फोटोग्राफी

सध्या फोटोग्राफी हा व्यवसायासाठी एक चांगला पर्याय म्हणून पुढे आला आहे. खास प्रसंगी म्हणजे प्री-वेडिंग शूट, लग्नसोहळे, वाढदिवसाच्या पार्टी आणि मॉडेलिंग फोटोग्राफीची मागणी खूप वाढली आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त भांडवल लागत नसून तुम्ही घरबसल्या लोकांशी थेट संपर्क साधू शकता.

कोचिंग क्लासेस

शैक्षणिक क्षेत्रामध्ये कोचिंग क्लासेसची मागणी वाढली आहे. शालेय शिक्षणाशिवाय इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी कोचिंग संस्थेत विद्यार्थी जात आहेत. जर तुम्हाला एखाद्या विषयाची चांगली समज असेल तर तुम्ही घरी बसून कोचिंग क्लासेस सुरू करू शकता.

त्याशिवाय बँकिंग, कर,मालमत्ता, कायदेशीर समस्या, गुंतवणूक इत्यादीसारख्या काही विषयांशी निगडित तुम्ही समस्या समजून घेतली तर तुम्हाला लोकांना आवश्यक सल्ला देऊन चांगले पैसे कमावता येतील.

योग प्रशिक्षक

योग ही भारतातील प्राचीन पद्धत असून तणाव आणि धावपळीने भरलेल्या या जीवनात योगाचे महत्त्व वाढत चालले आहे. योग हा सरावानंतर शिकला जात असून त्यासाठी चांगल्या योग प्रशिक्षकाची गरज असते. योग प्रशिक्षकांना फक्त देशातच नाही तर परदेशातही खूप मागणी आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक करावी लागत नाही.