आर्थिक

Business Idea: ‘या’ डेअरीची फ्रेंचाईजी घ्या आणि महिन्याला कमवा 5 ते 10 लाख! वाचा संपूर्ण माहिती

Published by
Ajay Patil

Business Idea:- सध्या नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी असल्यामुळे दिवसेंदिवस सुशिक्षित  बेरोजगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बेरोजगारीची समस्या भारता पुढील एक प्रमुख समस्या आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत जास्तीत जास्त तरुणांनी व्यवसाय करणे खूप गरजेचे आहे.

व्यवसाय उभारण्याला प्रोत्साहन मिळावे याकरिता  शासनाच्या माध्यमातून देखील वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत करण्यात येते. परंतु व्यवसाय सुरू करताना व्यवसाय कोणता सुरू करावा? त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल आणि इतर गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुरू करत असलेल्या व्यवसायाला बाजारपेठेत असलेली मागणी या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला समोर ठेवूनच व्यवसायाची आखणी करायला लागते.

जर आपण व्यवसायांची यादी पाहिली तर अगदी कमीत कमी गुंतवणुकीतून देखील आपल्याला चांगला नफा देणारे व्यवसाय सुरू करता येतात. व्यवसायांचे अनेक प्रकार असून यामध्ये जर तुम्ही एखाद्या प्रसिद्ध असलेली ब्रँडची फ्रेंचाईजी घेऊन जर व्यवसायला सुरुवात केली तर तुम्हाला व्यवसाय चांगला चालवण्यासाठी जास्त कष्ट करण्याची गरज पडत नाही.

कारण तुम्ही ज्या ब्रँडची फ्रेंचाईसी  घेतात तो ब्रँड बाजारपेठेमध्ये अगोदरच प्रसिद्ध असल्यामुळे त्याचे उत्पादने झटपट विकली जातात. अशाच पद्धतीने जर तुम्हाला देखील फ्रॅंचाईजी व्यवसायामध्ये यायचे असेल तर तुमच्याकरिता मदर डेरीची फ्रॅंचाईजी हा एक उत्तम व्यवसाय ठरू शकतो. यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत खूप चांगला पैसा मिळवू शकतात. याच दृष्टिकोनातून आपण या लेखांमध्ये मदर डेअरीची फ्रेंचायजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करणे गरजेचे आहे याबद्दलची माहिती घेऊ.

 मदर डेअरीचे उत्पादने कोणती आहेत?

मदर डेअरी फ्रेंचाईजी दुग्धजन्य पदार्थ आणि इतर खाद्यपदार्थ विक्री करण्याचे काम करते. दुग्धजन्य खाद्यपदार्थांव्यतिरिक्त ही कंपनी अन्नपदार्थ, फळे तसेच खाद्यतेल, विविध प्रकारच्या भाज्या, लोणचे, जाम, फळांचे रस इत्यादींची विक्री करते.

भारताचा विचार केला तर भारतामध्ये मदर डेअरी ही एफएमसीजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपन्यांपैकी एक असून देशामध्ये सुमारे 2500 रिटेल आउटलेट आहेत. त्याप्रमाणे इतर प्रसिद्ध कंपन्या त्यांचे जाळे विस्तारण्याकरिता फ्रेंचाईसी मॉडेलचा वापर करतात अगदी त्याच पद्धतीने मदर डेअरी देखील प्रयत्न करत आहे.

 मदर डेअरी फ्रेंचाईसीचे प्रकार किती?

मदर डेअरीच्या माध्यमातून दोन प्रकारच्या फ्रॅंचाईजी देण्यात येतात. यामध्ये पहिली मिल्क बूथ फ्रॅंचायजी असते. या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारचे डेअरी उत्पादने विकून चांगला पैसा मिळवू शकतात.

तसेच दुसरा प्रकार म्हणजे तुम्ही आईस्क्रीम फ्रॅंचाईजी घेऊ शकतात. या प्रकारामध्ये तुम्ही आईस्क्रीम पार्लर उघडू शकतात. या प्रकाराचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते आणि चांगल्या उत्पन्नाची आम्ही मिळते.

 मदर डेअरी फ्रॅंचाईजीसाठी किती गुंतवणूक करावी लागेल?

मदर डेरी फ्रेंचायजी मध्ये तुम्हाला किती गुंतवणूक करावी लागेल? हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर गुंतवणुकीची रक्कम ही तुम्ही सुरू करत असलेल्या फ्रेंचाईजीच्या स्थानानुसार कमी-जास्त असू शकते. समजा तुमच्याकडे तुमची स्वतःची जमीन असेल तर कमी गुंतवणुकीत तुम्ही हे काम करू शकतात.

परंतु तरीदेखील पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतचे गुंतवणूक याकरिता लागते. या खर्चामध्ये ब्रँड फी साठी लागणारे 50 हजार रुपये देखील समाविष्ट केलेले आहेत. फ्रेंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला मदर डेअरीशी संपर्क साधने गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही मध्यस्ताशिवाय या कंपनीच्या मुख्य कार्यालयाशी थेट संपर्क साधू शकतात.

 मदर डेअरीची उत्पादने कोणती आहेत?

मदर डेरी फ्रेंचायजी मध्ये तुम्ही अनेक प्रकारचे उत्पादने विक्रीसाठी ठेवू शकता. यामध्ये प्रीमियम फुल क्रीम मिल्क, फुल क्रीम मिल्क, प्रमाणित दूध, गाईचे दूध, टोन मिल्क, क्लासिक दही, लस्सी, फ्लेवर मिल्क बॉटल, तसेच पनीर, चीज स्लाईस, बटर, चीज ब्रेड, फ्रुट दही, गाईचे तूप तसेच मिल्क शेक इत्यादी उत्पादने विकू शकता.

Ajay Patil