Business Idea : नोकरीची झंझट संपली! कमी बजेटमध्ये सुरु करा लाखोंचा परतावा देणारा व्यवसाय; अशी करा सुरुवात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea : जर तुम्ही नोकरीला वैतागला असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता लाखो रुपयांची कमाई करून देणाऱ्या व्यवसायाची सुरुवात करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या व्यवसायासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही.

12 महिने या व्यवसायाला मागणी असते. कमी खर्चात या व्यवसायात चांगली कमाई करता येते. त्यामुळे तुम्ही आजच या व्यवसायाला सुरुवात करा.रोजच्या जीवनात चहाला खूप महत्त्व असून अनेकांच्या दिवसाची सुरुवात पहिल्या चहाने होते.

आता जर तुम्ही चहाचा व्यवसाय केला तर भरपूर कमाई करू शकता. परंतु यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांची रक्कम गुंतवावी लागणार आहे. त्यातून तुम्ही मजबूत कमाई करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक वर्गातील व्यक्ती हा व्यवसाय करू शकतो. व्यवसाय करताना निपुणता ठेवावी.

असा सुरु करा व्यवसाय

जर तुम्ही चहाचा व्यवसाय सुरु केला तर तुम्ही खुल्या बाजारात याची विक्री करू शकता. किरकोळ बाजारात चहाचा व्यवसाय करू शकता. तसेच अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, ज्या लूज चहाची विक्री करतात. अनेक कंपन्या चहा विकण्यासाठी फ्रँचायझीही देत आहेत. तर दुसरीकडे, जास्त कमाई करण्यासाठी, तुम्ही योग्य त्या किमतीमध्ये पॅकेटमध्ये चहाची विक्री करू शकता.

महिन्याला होईल इतकी कमाई

देशामध्ये चहाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चहाची लागवड करणारी अनेक राज्ये असून येथील चहाचा घाऊक दर 140 ते 180 रुपये किलो इतका आहे. बाजारात त्याची किंमत 200 ते 300 रुपये प्रतिकिलो इतकी असून जर तुम्ही 5,000 रुपयांना चहा विकत घेतला तर त्यातून तुम्हाला 20,000 रुपये मिळतील. ब्रँडेड कंपनी तयार करण्यासाठी नोंदणीची औपचारिकता तुम्हाला पूर्ण करावी लागणार आहे. समजा तुमच्याकडे चांगल्या दर्जाचा चहा असल्यास तर तुम्हाला आणखी चांगली कमाई करता येईल.

मशीन्स

चहाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मशिन्सची गरज पडेल. यात रेटो रेवेन मशीन, रोलर सीटीसी मशीन, मिडलटन स्टिरर मशीन, फायबर एक्स ट्रॅक्टर मशीन, व्हायब्रो सॉर्टर इत्यादी मशीन्सचा समावेश आहे. यामुळे तुमच्या व्यवसायातील वेळही वाचू शकतो. तसेच यातून तुम्हाला नफाही चांगला मिळेल.