Business Idea : जर तुम्ही नोकरीला वैतागला असाल आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्यासाठी बातमी कामाची आहे. कारण आता तुम्ही कधीही बंद न पडणारा म्हणजेच 12 महिने सुरु असणारा व्यवसाय सहज सुरु करू शकता.
बाजारात या व्यवसायाला खूप मागणी आहे. समजा तुमच्याकडे व्यवसायासाठी पैसे नसतील तर काळजी करू नका. आता तुम्हाला सरकारी मदत घेता येईल. सरकारी मदत घेऊन तुम्ही तुमचे व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. आता तुम्ही बिस्किट बनवण्याचा व्यवसाय सुरु करू शकता. यात तुम्हाला प्रत्येक महिन्याला एकूण ४० हजार रुपयांची सहज कमाई करता येईल. जाणून घेऊयात या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती.
जाणून घ्या बिस्किट प्लांटची किंमत-
कार्यरत भांडवल म्हणून या व्यवसायामध्ये 1.86 लाख रुपयांची गरज असते. यात कच्च्या मालाची किंमत, इतर घटक आणि कामगारांचे पगार, पॅकिंग आणि भाडे इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
स्थिर भांडवल म्हणून 3.5 लाख रुपयांची गरज असते. यामध्ये सर्व प्रकारच्या मशिनरी आणि उपकरणांच्या किमतीचा समावेश केला जातो.
एकूण खर्च 5.36 लाख रुपये इतका येतो. म्हणजेच यात 5.36 लाख रुपये खर्च करून बिस्किट निर्मितीचा व्यवसाय सहज सुरू करता येईल. यामध्ये तुमच्या खिशातून केवळ 90 हजार रुपये गुंतवून उरलेली रक्कम मुदत कर्ज आणि खेळत्या भांडवल कर्जावर उभारता येते.
ठेव-खर्च खाते (वार्षिक/रु.)
>> उत्पादन खर्च: 14.26 लाख रुपये
>> कर्जाचे व्याज: 50 हजार रुपये
>> टर्न ओव्हर: 20.38 लाख रुपये
>> एकूण नफा: 6.12 लाख रुपये
>> प्राप्तिकर: 13-15 हजार रुपये
>> इतर खर्च: 70-75 हजार रुपये
>> निव्वळ नफा: 4.60 लाख रुपये
>> मासिक उत्पन्न: 35-40 हजार रुपये
सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपूर्ण वर्षभर म्हणजे १२ महिने या व्यवसायाला बाजारात खूप मागणी असते. त्यामुळे ३८ टक्के वार्षिक परताव्यानुसार तुम्ही केलेली संपूर्ण गुंतवणूक दीड वर्षात वसूल होऊ शकते. आजच सरकारी मदत घेऊन हा व्यवसाय सुरु करा.