Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Business Idea: कमी गुंतवणुकीत घरबसल्या सुरू करा ‘हा’ जबरदस्त व्यवसाय ! होणार लाखोंची कमाई ; जाणून घ्या कसं

Business Idea: या महागाईच्या काळात तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन व्यवसाय सुरु करून बंपर कमाई करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज एका भन्नाट आणि तुमच्यासाठी बेस्ट ठरणाऱ्या बिझनेस आयडियाबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही अगदी कमी गुंतवणूक करून वर्षाला लाखो रुपये सहज कमवू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट बिझनेस आयडियाबद्दल संपूर्ण माहिती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगतो सध्या रेडिमेड गोष्टींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. म्हणूनच आता लोकांनी मसाले, कांद्याची पेस्ट, लसूण पेस्ट हे सगळे रेडीमेड विकत घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे वेळही वाचतो आणि जेवणालाही मस्त चव येते चला तर मग जाणून घेऊ या कारखान्यात कांद्याची पेस्ट बनवण्यासाठी किती खर्च येतो आणि तुम्हाला किती फायदा होईल.

खादी ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) आपल्या अहवालात सांगितले आहे की, तुम्ही 4.19 लाख रुपयांमध्ये कांद्याची पेस्ट बनवण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे किमान 300 ते 500 चौरस यार्ड जागा असावी. कारण यामध्ये तुम्हाला कारखाना उभारण्यासाठी आणि टिन शेड बसवण्यासाठी एक लाख रुपये खर्च करावे लागतील.

इतका खर्च येईल

याशिवाय पेस्ट तयार करण्यासाठी फ्राइंग पॅन, ऑटोक्लेव्ह स्टीम कुकर, डिझेल भट्टी, स्टरलाइजेशन टाकी, छोटी भांडी, मग, कप इत्यादींवर सुमारे 1.75 लाख रुपये खर्च येणार आहेत. एवढेच नाही तर हा व्यवसाय चालवण्यासाठी तुमच्यासोबत 2.75 लाख रुपये लागतील, कारण यासाठी तुम्हाला कच्चा माल खरेदी, पॅकिंग, वाहतूक आणि कारागिरांची मजुरी इत्यादींवर खर्च करावा लागेल.

KVIC अहवालानुसार, जर तुम्ही एका वर्षात 7.50 लाख रुपयांची विक्री करू शकत असाल, तर त्यातून सर्व खर्च वजा केल्यावरही तुम्ही 1.75 लाख रुपयांची बचत करू शकता. त्याच वेळी, या व्यवसायातील नफा देखील आपल्या मार्केटिंगवर अवलंबून असतो. तुम्ही तुमचे बहुतांश उत्पादन मोठ्या प्रमाणात विकत नसल्यास, तुम्ही थेट ग्राहकांना किरकोळ विक्री कराल, त्यानंतर तुम्ही अधिक कमाई करू शकता.

हे पण वाचा :- Benefits Of Clove: काय सांगता ! फक्त 3 लवंगा पुरुषांसाठी करू शकतात चमत्कार ; जाणून घ्या सेवनाचे फायदे