आर्थिक

Business Idea: 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीत ‘हा’ व्यवसाय सुरू करा व 3 तास काम करून 2 हजार कमवा! वाचा माहिती

Published by
Ajay Patil

Business Idea:- अनेकजणांना जास्तीत जास्त पैसे मिळवण्यासाठी काहीतरी चांगला व्यवसाय सुरू करायचा असतो किंवा काहीजण नोकरी करत असतात आणि नोकरीसोबत अतिरिक्त उत्पन्न म्हणून कमी वेळेत चांगला पैसा मिळेल अशा व्यवसायाच्या शोधात असतात.

कारण आजकाल महागाईच्या कालावधीमध्ये तुम्ही जितका जास्त प्रमाणात पैसा कमवाल तितका तुमचा फायदा होत असतो. परंतु व्यवसाय सुरू करण्यामध्ये सगळ्यात प्रमुख अडचण येते ती म्हणजे व्यवसाय कोणता सुरू करावा व कमीत कमी भांडवलात आपल्याला चांगला नफा कोणत्या व्यवसायातून मिळेल?

कारण आपण जर अशा व्यवसायांची यादी पाहिली तर ती खूप मोठी तयार होते व यामधून कोणत्या व्यवसायाची निवड करावी? याबाबतीत खूप मोठा गोंधळ उडतो.

त्यामुळे आपण या लेखामध्ये अशा एका छोटा स्वरूपातला व्यवसायाची माहिती घेणार आहोत जो तुम्ही फक्त पाच ते दहा हजारच्या भांडवलात सुरू करून दिवसातील फक्त दोन ते तीन तास काम करून हजार रुपये कमवू शकता.

 स्प्राऊट व्यवसाय देईल तुम्हाला चांगला पैसा

सध्या कोरोना कालावधीपासून सर्वसामान्य नागरिक आता आरोग्याच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर जागरूक झालेले आहेत. त्यामुळे स्प्राऊट व्यवसाय हा खूप महत्त्वाचा व्यवसाय ठरणार असून याला आता दिवसेंदिवस मागणी वाढत जाणार आहे.

स्प्राऊट व्यवसाय म्हणजे किंवा स्प्राऊट म्हणजे कडधान्य आणि काही भाज्यांपासून बनवला जाणारा एक कोरडा पौष्टिक पदार्थ असतो. त्यामुळे या पौष्टिक पदार्थाची मागणी आरोग्याच्या दृष्टिकोनातून वाढत असून या व्यवसायाला आता मागणी देखील चांगल्या प्रकारे आहे.

स्प्राऊट मध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे कार्बोहायड्रेट आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर असल्याने डॉक्टर देखील आता स्प्राऊट खाण्याचा सल्ला देतात व त्यामुळे या व्यवसायाला अच्छे दिन आहेत.

 कसा सुरू कराल स्प्राऊट व्यवसाय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. तुमच्या खिशामध्ये पाच हजार रुपये असतील तरी तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. एखादा छोट्या मोक्याच्या जागी चार ते पाच टेबल खुर्च्या टाकून तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करू शकतात.

स्प्राऊट व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला हरभरा तसेच मूग, कॉर्न, काकडी, कांदा आणि टोमॅटो यासारख्या पदार्थांची आवश्यकता असते. तसेच चविष्ट स्प्राऊट तुम्हाला तयार करता यावे याकरिता तुम्ही यूट्यूब च्या माध्यमातून चविष्ट स्वरूपाचे स्प्राऊट्स बनवण्याच्या रेसिपीज शिकू शकतात.

कारण युट्युब वर अनेक प्रकारचे याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. तुम्ही अगदी सकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये देखील हा व्यवसाय सुरू केला तरी तुम्ही चांगली कमाई करू शकतात.

 किती होईल कमाई?

साधारणपणे जर आपण आज बाजारपेठेमधील स्प्राऊटची किंमत बघितली तर एक प्लेट वीस रुपयांना विकली जाते. जर तुम्ही सकाळी सहा ते नऊ या वेळेत तुमची स्प्राऊटची विक्री केली व साधारणपणे शंभर प्लेट्स विकल्या तरी तुम्ही दररोज दोन हजार रुपये कमवू शकतात.

म्हणजेच महिन्याचा हा आकडा पाहिला तर साठ हजार रुपयापर्यंत जातो. त्यामध्ये तुमचा खर्च वगळल्यास तुम्ही कमीत कमी 40 हजार रुपयापर्यंत कमाई या माध्यमातून महिन्याला आरामशीर करू शकता व जसा जसा तुमचा व्यवसाय वाढत जाईल व विक्रीत वाढ होईल तसं तसं तुमचा नफा देखील यामध्ये वाढत जातो.

Ajay Patil