आर्थिक

Business Idea Tips : कमी गुंतवणुकीत बंपर नफा! 10,000 रुपये गुंतवून सुरु करा हा व्यवसाय, दरमहा मिळेल हजारोंचा नफा

Published by
Ahmednagarlive24 Office

Business Idea Tips : तुम्हीही नोकरी न करता व्यवसायाच्या शोधात आहात आणि तुम्हाला कमी बजेटमधील व्यवसाय करायचा आहे तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आज तुम्हाला कमी बजेटमधील व्यवसायाबद्दल सांगणार आहोत जो अगदी कमी जागेत तुम्ही करू शकता.

अनेकजण व्यवसायाच्या शोधात आहेत मात्र त्यांना कमी बजेटमध्ये कोणता व्यवसाय आहे हे माहिती नसते. तसेच व्यवसाय सुरु केल्यानंतर त्याला बाजारपेठ कुठे उपलब्ध होईल हे देखील अनेकांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना व्यवसायात तोटा सहन करावा लागत असतो.

बाजारात दर्जेदार लोणच्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे तुम्ही लोणच्याचा व्यवसाय सुरु करू शकता. इतरांपेक्षा लोणचे बनवून तुम्ही बाजारपेठेत ते विकून चांगला नफा कमवू शकता. हा एक कमी जागेत आणि कमी बजेटमध्ये सुरु केला जाणारा व्यवसाय आहे. या व्यवसायमध्ये नफा देखील चांगला आहे.

भारतीयांना जेवणाबरोबर लोणचे खाणे अनेकांना अधिक आवडत असते. तसेच प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये लोणचे पाहायला मिळते. त्यामुळे लोणच्याला बाजारात प्रचंड मागणी आहे. चांगली बाजारपेठ उपलब्ध असल्याने कमी वेळात तुम्ही चांगला नफा कमवू शकता.

कमी गुंतवणुकीत लोणचे बनवण्याचा व्यवसाय

अनेक लोकांना जेवणाबरोबर लोणचे खाणे आवडते. मात्र प्रत्येकालाच ते घरी बनवणे शक्य नाही. त्यामुळे तुम्ही कमी गुंतवणूक आणि कमी जागेत लोणचे व्यवसाय करू शकता. घरगुती पद्धतीने बनवलेले लोणच्याला प्रचंड मागणी आहे. घरगुती पद्धतीने बनवलेले लोणचे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देखील विकू शकता.

लोणच्याचा व्यवसाय कमी गुंतवणुकीत सुरू करा

तुम्हाला लोणच्याचा व्यवसाय करण्यासाठी कुठल्याही प्रकारची जागा भाडेतत्वावर घेण्याची गरज नाही. कारण हा व्यवसाय तुम्ही घरगुती पद्धतीने सुरु करू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला कच्चे आंबे आणि लोणचे बनवण्यासाठी लागणारे मसाले विकत घ्यावे लागतील.

10,000 रुपयांच्या गुंतवणुकीत तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. तुम्ही बाजारपेठेत लोणच्याची विक्री करून दरमहा 25,000 ते 30,000 रुपयांचा नफा कमवू शकता. या व्यवसायांत तुम्हाला जास्त पैसे गुंतवणूक करण्याची गरज नाही.

परवाना कसा मिळवायचा?

तुम्हाला लोणच्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर सर्वत प्रथम तुम्हाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) कडून परवाना घ्यावा लागेल. त्यानंतरच तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. हा परवाना तुम्ही ऑनलाइन पद्धतीने देखील मिळवू शकता.

Ahmednagarlive24 Office