आर्थिक

Business Idea: 2 ते 5 लाख रुपये भांडवलात सुरू करा ‘हे’ व्यवसाय आणि आयुष्यभर खेळा पैशांमध्ये! कमी गुंतवणुकीत बना उद्योजक

Published by
Ajay Patil

Business Idea:- तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही अगदी दहा हजारांमध्ये देखील सुरू करू शकतात आणि काही व्यवसाय सुरू करण्यासाठी अगदी लाखो रुपये देखील लागतात. तुम्ही किती भांडवल टाकतात यावर तुमच्या व्यवसायाचे स्वरूप ठरत असते. लाखो रुपये गुंतवणूक करून व्यवसाय सुरू करून जितका नफा तुम्ही मिळवू शकतात तितकाच नफा तुम्ही अगदी काही हजार रुपये गुंतवून देखील मिळवू शकतात.

व्यवसाय सुरू करणे हे आपल्या आर्थिक गुंतवणुकीची क्षमता आणि व्यवसायाचे स्वरूप यावर प्रामुख्याने अवलंबून असते. तुम्हाला देखील जर व्यवसाय सुरू करायचा असेल आणि तुमच्याकडे जर दोन ते पाच लाख रुपये भांडवल असेल तर या लेखामध्ये आपण अशा काही व्यवसायांची माहिती घेणार आहोत जे तुम्हाला कमी पैशांमध्ये उद्योजक बनण्याची  सुवर्णसंधी तर निर्माण करून देतीलच परंतु आयुष्यभर तुम्ही पैशांमध्ये खेळत राहाल.

 दोन ते पाच लाख रुपये भांडवलामध्ये सुरू करा हे व्यवसाय

1- जिम किंवा फिटनेस सेंटर सध्या आरोग्याला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले जात असून मोठ्या प्रमाणावर लोक आता आरोग्याबाबत जागरूक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता श्रीमंत किंवा उच्चभ्रू लोकच नाही तर अगदी लहान शहरे आणि मध्यमवर्ग लोक देखील  व्यायामाला महत्व देत आहे व त्यामुळे जिम व फिटनेस सेंटरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत आहे.

त्यामुळे ही संधी हेरून तुम्ही पाच लाख रुपये गुंतवणूक करून एक छोटीशी जिम उघडू शकता. जसे जसे लोक तुमच्या जिम मध्ये जॉईन होतील तसं तसं तुम्ही जिमचा विस्तार करू शकतात. जिम सुरू करण्यासाठी तुम्हाला मोठी जागा लागते आणि व्यायामासाठी आवश्यक साधने तसेच एसी आणि म्युझिक सिस्टीमची गरज भासते.

त्यामध्ये तुम्ही युवक आणि ध्यान केंद्र तसेच हास्य केंद्र, झुंबा क्लब देखील एकत्र करू शकतात व त्यामुळे तुमचे सभासदामध्ये वाढ होऊ शकते.

2- डिस्पोजेबल पेपर प्लेट्स, कप तसेच ग्लासेसचे उत्पादन विवाह सोहळे तसेच वाढदिवस साजरे करण्याकरिता आणि इतर व्यवसायिक कार्यक्रमांसारख्या ठिकाणी आपल्याला आता मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल कप आणि प्लेटचा वापर दिसून येतो व ती आता गरज बनलेली आहे.

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वाढत्या जागृतीमुळे आता अनेक लोक प्लास्टिकच्या प्लेट्स, कप तसेच ग्लास इत्यादी ऐवजी कागदाच्या वस्तूंना प्राधान्य देतात. हा व्यवसाय पर्यावरण पूरक आणि फायदेशीर आहे. पेपर प्लेट्स तसेच कप, ग्लासेस आणि टंबलर तयार करण्यासाठी ज्या काही मशीन्स असतात त्या खूप महाग नसतात.

तुम्ही कोणत्याही एका मशीनमध्ये पाच लाखापेक्षा कमी गुंतवणूक करून तुमचे उत्पादन युनिट सहजपणे सुरू करू शकतात  ज्या प्रकारे तुमचा व्यवसाय वाढत जाईल या पद्धतीने मशीन वाढवत जाऊन तुम्ही व्यवसायाचा विस्तार करू शकता.

3- पेस्ट कंट्रोल व्यवसाय आपल्याला बऱ्याच घरांमध्ये कीटक तसेच झुरळांचा प्रादुर्भाव दिसून येतो. एवढेच नाही तर अशा प्रकारचे कीटक शेतामधील पिके आणि भाजीपाला देखील नष्ट करतात व त्यामुळे नुकसान होते. या कीटकांचा प्रादुर्भाव थांबवण्याकरिता अनेक जण आता पेस्ट कंट्रोल सेवेच्या शोधात असतात.

हा व्यवसाय आता आधुनिक स्वरूपाचा झाला असून यामध्ये आता बरीच उपकरणे आणि कीटकनाशक आली आहेत. याच्या साह्याने उंदीर तसेच झुरळेच नाहीतर वाळवी देखील आपण प्रभावीपणे काढू शकतो. तुम्हाला जर पेस्ट कंट्रोल व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला कीटक नष्ट करण्यासाठी लागणारी साधने आणि रासायनिक फवारण्यांमध्ये गुंतवणूक करावी लागते.

या व्यवसायामध्ये फर्म तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब, कार्पोरेट कार्यालये तसेच गृहनिर्माण संस्था आणि इतर लोक तुमचे ग्राहक असू शकतात. हा कमी जोखमीचा  आणि कमीत कमी गुंतवणुकीचा व्यवसाय असून पाच लाखाच्या गुंतवणुकीत तुम्ही सुरू करू शकतात.

4- फोटो स्टुडिओ आजकाल वाढदिवस असो किंवा प्री-वेडिंग सेरेमनी किंवा लग्न, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांमध्ये फोटोशूट चा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर आहे व तो दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. जीवनातील असे अनमोल क्षण कॅप्चर करण्यासाठी लोक भरपूर पैसे खर्च करायला सध्या तयार असल्याचे आपल्याला दिसून येते.

त्यामुळे ही संधी शोधून चांगला फोटोग्राफर होण्याकरता तुमच्याकडे जर व्यावसायिक कौशल्य असेल तर तुम्ही व्यावसायिक फोटोग्राफी व्यवसाय सुरू करू शकतात व या माध्यमातून चांगला पैसा मिळवू शकतात. तसेच भारतामध्ये वेडिंग फोटोग्राफी हा एक फायदेशीर व्यवसाय असून लोक लग्नासाठी फोटोग्राफी आणि व्हिडिओ साठी खूप पैसा खर्च करायला तयार आहेत.

हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला स्टुडिओ बनवावा लागतो व त्यासाठी तुम्ही भाड्याने देखील जागा घेऊ शकतात. तसेच उत्तम प्रतीचे कॅमेरे, लेन्स, लाइट्स आणि ट्रायपॉड सह याची सुरुवात करू शकता आणि जसजसा तुमचा व्यवसाय वाढेल तसे तुम्ही चांगले प्रतिभावान फोटोग्राफरची एक टीम देखील तुमच्या सोबत घेऊ शकतात.

या व्यवसायासोबत तुम्ही टी-शर्ट तसेच पिलो कव्हर, टाइल्स इत्यादीवर फोटो प्रिंट करण्याचा व्यवसाय देखील सुरू करू शकतात.कारण सध्या अशा गोष्टींचा खूप मोठा ट्रेंड असून या माध्यमातून काम करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात.

त्यासाठी लागणाऱ्या यंत्रांकरिता देखील  गुंतवणूक करण्याची गरज भासत नाही. कारण यामध्ये तुम्ही इतर ठिकाणाहून प्रिंट करून तुमच्या ग्राहकांना अशा वस्तू उपलब्ध करून देऊ शकता. फोटो स्टुडिओ व्यवसायामध्ये तुम्ही फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय देखील सुरू करू शकता.

Ajay Patil