Business Ideas : कमी खर्चात सुरू करा दरमहा बंपर कमाई करून देणारा व्यवसाय, बाजारातही आहे मोठी मागणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : प्रत्येकाला कमी खर्चात चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय सुरु करायचा असतो. परंतु त्यांना कोणता व्यवसाय करावा ते समजत नाही. जर तुम्हालाही कमी खर्चात आणि कमी वेळेत व्यवसाय चालू करायचा असेल तर जरा इकडं लक्ष द्या.

समजा तुम्हाला हा व्यवसाय म्हणून शेती करायचा असेल, तर लेमन ग्रास शेती हा तुमच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. हे एक असे पीक आहे, जे कमी गुंतवणुकीत अधिक पटींनी जास्त फायदा मिळवून देते. या पिकाच्या तेलापासून अनेक सुवासिक पदार्थ तसेच औषधेही तयार करता येतात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात आढळणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे आजार नाहीसे होतात. त्यामुळे पिकाचे नुकसान होत नाही.

पंतप्रधानांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून यादेखील आपल्या मन की बात कार्यक्रमात लेमन ग्रासचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील बिष्णुपूर येथे संयुक्तपणे लेमन ग्रासची लागवड करत असणाऱ्या 30 लोकांच्या गटाचे कौतुक केले होते. खरंतर, लेमन ग्रास शेती हे व्यावसायिक पीक आहे. या पिकाच्या लागवडीनंतर 4 महिन्यांनी ते तयार होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात लेमन ग्रासची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. साबण, तेल आणि औषधे यासह सौंदर्यप्रसाधने यातून तयार करता येतात.

गुंतवणूक

या पिकाची लागवड शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे. लेमन ग्रासचा वापर औषधे बनवण्यासाठी करतात. विशेष म्हणजे ओसाड जमिनीवरही तुम्ही याची लागवड करू शकता. या पिकाला जास्त खतांची गरज नसते. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किमान 20 हजार रुपयांची गुंतवणूक करून त्याची सुरुवात करू शकता. 20 हजार रुपये खर्च करून एक हेक्टरमध्ये त्याची लागवड केली तर 6 वर्षांत तुम्हाला 4 ते 5 लाख रुपयांचा नफा मिळेल. तुम्ही एकदा शेती करायला सुरुवात केली की तुम्हाला 4 ते 6 वर्षांपर्यंत उत्पादन मिळवता येते.

जाणून घ्या फायदे

लेमन ग्रासची मागणी खूप वाढत आहे. यालाच चायना ग्रास आणि मलबार गवत असे म्हणतात. याच्या पानांना लिंबाचा वास येतो. अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असून त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजेही आढळतात. अनेकजण त्याचा चहा बनवण्यासाठी वापर करतात. या वनस्पतीपासून सिट्रल नावाचे तेलदेखील मिळते. औषधी गोष्टींशिवाय हे गवत परफ्यूम, साबण आणि अनेक प्रकारच्या सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरतात. विशेष म्हणजे दुष्काळी भागातही याची लागवड करता येते.

यामुळे अनेक आजार टाळता येतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, सोडियम, लोह आणि पोटॅशियम पाहायला मिळतात. डोकेदुखी, मायग्रेन, टक्कल पडणे, खोकला-सर्दी, पोटाशी संबंधित समस्या अशा अनेक आजारांवर लेमन ग्रास खूप फायद्याचा आहे.

कुठे करतात लागवड?

लेमन ग्रासची लागवड उत्तर प्रदेश, केरळ, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, आसाम, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रमध्ये करतात. बिहारच्या काही भागातही त्याची लागवड केली जात आहे.

हवामान

सर्वात महत्त्वाचे म्हणजे या पिकाची लागवड जवळपास सर्व प्रकारच्या जमिनीत केली जाते. सुपीक चिकणमाती माती रोपाच्या चांगल्या वाढीसाठी खूप फायदेशीर असते. परंतु पाणी साचलेल्या भागात लागवड टाळावी. सर्वसाधारण हवामान त्याच्या लागवडीसाठी योग्य आहे. त्याच्या रोपाला जास्त सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे वनस्पतींमध्ये तेलाचे प्रमाण वाढते. सर्वोत्तम तापमान 20 ते 30 अंश सेल्सिअस गरजेचे आहे.

नफा

हे लक्षात घ्या की या पिकाची लागवड करण्यापूर्वी शेताची दोन ते तीन वेळा नांगरणी करावी. नांगरणीनंतर शेणखत टाकावे. त्यानंतर झाडांची लागवड करा. लेमन ग्रास लागवडीसाठी जुलै महिना फायदेशीर आहे. बाजारात लेमन ग्रास तेलाची किंमत 1100 ते 1200 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.