Business Ideas : ‘झाडे लावा आणि झाडे जगवा’, अशी घोषणा आपण लहानपणापासूनच ऐकत आलो आहोत. परंतु जर कोणी ‘झाडे लावा आणि लाखो कमवा’, असे सांगितले तर तूमचा यावर विश्वास बसेल का? परंतु, हे खरे आहे. जर विशिष्ट प्रकारची झाडे लावली तर तूम्ही करोडपती होऊ शकता.
विशेष म्हणजे बाजारात या झाडाला खूप मागणी आहे. शिवाय ते वेगवेगळ्या आजारांसाठी खूप फायद्याचे आहे. तुम्हीही त्याची लागवड केली तर तुम्हालाही करोडो रुपयांची कमाई करता येईल. कसे ते जाणून घ्या घ्या सविस्तरपणे.
महोगनीची लागवड डोंगराळ भाग वगळता सर्व मैदानी भागात केली जाते. या झाडाची पाने, बिया आणि लाकूड यांना कॅनडा, ब्राझील आणि अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यामुळे ही झाडे लावून तुम्ही चांगली कमाई करू शकता.
अशी करा या झाडांची लागवड
महोगनी लागवड करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर शेताची खोल नांगरणी करून फळी लावून शेत समतल करावे लागणार आहे. त्यानंतर 5 ते 7 फूट अंतरावर 3×2 खड्डा तयार करून रेषा ते ओळ अंतर 4 मीटर यात ठेवा. आता हे खड्डे शेणखत आणि रासायनिक खते जमिनीत मिसळून बुजवून टाका.
आता त्यांना चांगले पाणी देऊन काही काळानंतर यात महोगनीची रोपे लावा. परंतु हे लक्षात ठेवा की पाणी साचलेल्या आणि खडकाळ जमिनीत या रोपांची लागवड करू नये. लागवड करत असताना अति उष्ण किंवा अति थंड हवामान टाळावे.
या झाडाचा प्रत्येक भागाची बाजारात चांगल्या किमतीत विक्री केली जात आहे. याच्या लाकडाचा वापर पाण्याची जहाजे, मूर्ती, सजावटीच्या वस्तू आणि वाद्ये बनवण्यासाठी करण्यात येतो. तसेच टॉनिक औषध बनवण्यासाठी या झाडाच्या बिया आणि पानांचा वापर केला जातो. त्याशिवाय कॅन्सर, दमा, सर्दी, रक्तदाब आणि मधुमेह यासह अनेक आजारांवर या पानांचा वापर केला जातो. त्याची पाने शेतीसाठी कीटकनाशक तयार करण्यासाठी वापरण्यात येतात. या पानांचे तेल साबण, रंग आणि वार्निश उद्योगामध्ये वापरले जाते.
कमाई
महोगनीचे झाड 12 वर्षात 60 ते 80 फूट उंचीचे घनदाट वृक्ष बनते. एका झाडापासून एकूण 40 घनफूट लाकूड मिळते. तसेच एका घनफूट लाकडाची 1300 ते 2500 रुपयांना विक्री केली जाते. जर हे 1500 रुपये प्रति घनफूट दराने विकले तर एका झाडाची 60,000 रुपयांना विक्री केली जाते. तर त्याच्या एका रोपातून सुमारे 5 किलो बियाणे मिळते. बाजारामध्ये बियाण्याची किंमत एक हजार रुपये किलो इतकी आहे. त्यामुळे आता तुम्ही त्याची अनेक झाडे लावून चांगली कमाई करू शकता.