आर्थिक

Business In Summer: उन्हाळ्यात सुरू करा ‘हे’ छोटे परंतु चांगला नफा देणारे व्यवसाय! कमी खर्चात कराल चांगली कमाई

Published by
Ajay Patil

Business In Summer:- व्यवसाय ज्याप्रकारे मोठ्या स्वरूपात असतात. अगदी त्याच पद्धतीने छोटे छोटे व्यवसाय देखील चांगला नफा मिळवून देतात. छोट्या व्यवसायांची एक खासियत जर आपण पाहिली तर अगदी कमीत कमी गुंतवणुकीमध्ये आपल्याला चांगला पैसा या माध्यमातून मिळत असतो.

अगदी त्यातल्या त्यात जर हंगामी व्यवसायांची निवड केली तर त्या हंगामानुसार असे व्यवसाय खूप चांगल्या पद्धतीने रन होतात व आर्थिक दृष्टिकोनातून फायदा देखील होतो. या अनुषंगाने आता उन्हाळा सुरू असून शाळा आणि कॉलेज यांना सुट्टीचा हा कालावधी असतो.

त्यामुळे बरेच तरुण-तरुणी या सुट्टीच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी काम करतात किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करतात. अशाप्रसंगी तुम्हाला देखील या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये एखादा कमीत कमी बजेट मधला आणि घरच्या घरी करता येईल असा व्यवसाय करायची इच्छा असेल तर  या संबंधी काही व्यवसायांची माहिती दिली आहे. त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो.

 उन्हाळ्यामध्ये करता येणारे व्यवसाय

1- उन्हाळी पिकनिक उन्हाळ्यामध्ये शाळा कॉलेजला सुट्टी असल्यामुळे बरेच जण कुठे बाहेर पिकनिकला म्हणजेच फिरायला जाण्याचा प्लान आखतात. अशावेळी लोकांना फिरण्यासाठी नवीन आणि उत्तम असे पर्याय हवे असतात व अशा पर्यायाच्या शोधात असे लोक असतात.

त्यामुळे तुम्ही लोकांच्या या गरजेचा फायदा उठवून तुमची कल्पकता वापरून छोट्या स्वरूपात किंवा मोठ्या स्वरूपात पिकनिक आयोजित करू शकतात. यामध्ये तुम्ही अगदी एका दिवसाची पिकनिक  आयोजित करण्यापासून तर थेट कुलू, मनाली आणि दार्जिलिंग किंवा उटी सारख्या थंड हवेच्या ठिकाणी देखील ग्रुप पिकनिक किंवा कुटुंबांची सहल आयोजित करू शकतात.

या व्यवसाय प्रकारांमध्ये तुम्ही पिकनिकचा एकूण खर्च काढून त्यात तुमचा नफा  काढून प्रत्येक व्यक्तीसाठी सहभाग शुल्क ठरवून बुकिंग करू शकतात. हा व्यवसाय तसा कायम देखील चालणार आहे परंतु यामध्ये जर तुम्ही थोडे  तुमचे स्किल आणि कल्पकता वापरली तर सहजपणे हा व्यवसाय तुम्हाला चांगला पैसा देऊ शकतो.

2- ताक,लस्सी, फालुदा सारख्या पदार्थांचे छोटे स्टॉल उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये अनेकांना ताक, लस्सी यासारखे दुधाचे पदार्थ प्यायला खूप आवडतात. आरोग्याला उपयुक्त असणारे ही पेय उन्हाळ्यामध्ये अनेक जणांना प्यावीशी वाटतात.

त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये थोड्या गर्दीच्या ठिकाणी बाजारपेठेचे ठिकाण असेल किंवा एखादे गार्डन वगैरे असेल अशा ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये अशा पदार्थांचे स्टॉल्स लावू शकतात. अशा व्यवसायामध्ये दोन ते पाच हजारापर्यंत गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकतात.

3- आंब्याची विक्री आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंब्याची विक्री होते व आंबे खायला प्राधान्य दिले जाते. आंबा विक्रीचा व्यवसाय फक्त दोन महिन्यासाठी असला तरी देखील वर्षभराची कमाई करून देणारा हा व्यवसाय आहे. हा व्यवसाय तुम्ही छोट्या स्वरूपामध्ये किंवा अगदी मोठ्या स्वरूपामध्ये देखील करू शकता

वा अगदी घरच्या घरी सुद्धा याचा व्यवसाय तुम्ही करू शकतात. त्यामध्ये तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे की आंब्याचे साठवणूक व काळजी कशी घ्यावी. यामध्ये तुम्हाला शेतकऱ्याकडून किंवा जवळच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून आंबा खरेदी करावा लागेल. तसेच जर तुमचे आसपास किंवा तुमच्या काही ओळखीचे शेतकरी आंबा उत्पादक असतील

तर तुम्ही त्यांच्याकडून देखील थेट खरेदी करू शकतात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक ठिकाणचे अंबा बागायतदार किंवा शेतकरी आंबा विक्रीसाठी आणतात व अशा शेतकऱ्यांकडून देखील तुम्ही अनुभवाने आंबा खरेदी करू शकतात. यामध्ये तुम्ही घरच्या घरी दोन दोन डझनचे बॉक्स पाच डझनची लाकडी पेटी तयार करून लोकांना घरपोच डिलिव्हरी देखील देऊ शकतात.

व्हाट्सअप स्टेटस मध्ये तसेच फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आंब्यांची आकर्षक फोटो टाकून तुमचे कस्टमर वाढवू शकतात. अशा पद्धतीने आंब्या विक्रीचा व्यवसाय देखील उन्हाळ्यामध्ये खूप चांगला पैसा देऊन जाऊ शकतो.

4- पापड, लोणचे किंवा मसाल्यांची विक्री आपल्याकडे आहारामध्ये लोणची, पापड तसेच सांडगे व मसाल्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्याच्या कालावधीत वाळवण, पापड, लोणची तसेच मसाले इत्यादी पदार्थ छोट्या प्रमाणामध्ये बनवून त्यांची शंभर ग्रॅम किंवा पाव किलोची पाकिटे तयार करून विकू शकतात.

अगदी दहा ते पंधरा हजार रुपयांचा कच्चामाल भरला तरी तुम्हाला अगदी छोट्या प्रमाणामध्ये घरच्या घरी हा व्यवसाय उन्हाळ्यात करता येऊ शकतो. या पद्धतीने तयार केलेला माल हा तुम्ही तुमच्या आजूबाजूची किराणा दुकाने किंवा सुपर मार्केट व मॉलमध्ये देखील विक्रीला ठेवू शकतात.

Ajay Patil