आर्थिक

Business Success Story: दोघा मित्रांनी बिर्याणी विक्री करून उभारली 840 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची कंपनी! वाचा बिर्याणी बाय किलोची यशोगाथा

Published by
Ajay Patil

Business Success Story:- आयुष्यामध्ये काहीतरी करण्याचे स्वप्न प्रत्येकाचे असते. परंतु ते स्वप्न जर सत्यामध्ये उतरवायचे असेल तर त्याकरिता कष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो हे मात्र निश्चित. तसेच तुम्ही करत असलेल्या कष्ट आणि प्रयत्नांना योग्य दिशेने नेणे म्हणजेच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशेने प्रयत्न करणे खूप गरजेचे असते.

जोपर्यंत तुम्ही ठरवलेले ध्येय गाठत नाहीत तोपर्यंत सातत्याने प्रयत्न करत राहणे तसेच चिकाटी व जिद्द ठेवून अडचणींवर मात करत चालत राहणे खूप गरजेचे असते. जेव्हा या सगळ्या गुणांचा मिलाप व्यक्तिमध्ये असतो तेव्हा असे व्यक्ती यशस्वी होतातच.

हीच बाब प्रत्येक उद्योग व्यवसायाला देखील लागू होते. आजकालच्या कालावधीमध्ये अनेक स्टार्टअप कंपन्या तरुणांच्या माध्यमातून उभारल्या जात आहेत व या स्टार्टअप कंपन्या उभारल्यानंतर त्यांना यशस्वी करण्यासाठी जे तरुण  अभ्यास पूर्ण रीतीने प्रयत्न व सगळ्या आवश्यक गोष्टी करतात ते कोटी रुपयांचे साम्राज्य उभे करतात.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण उदाहरण पाहिले तर बिर्याणी बाय किलो या स्टार्टअप कंपनीचे घेता येईल. अगदी छोट्याशा स्वरूपामध्ये सुरू झालेली ही कंपनी आज 840 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या साम्राज्य उभे करण्यामध्ये यशस्वी ठरली आहे.

 बिर्याणी बाय किलोची यशोगाथा

कष्ट करण्याची तयारी असेल तर यश व्यक्तीला मिळतेच हे आपण बघितले. असेच कष्ट करण्याची तयारी असलेल्या कौशिक रॉय आणि विशाल जिंदाल यांनी 2015 मध्ये बिर्याणी बाय किलो या स्टार्टअपची सुरुवात केली.

अगदी छोट्या स्वरूपामध्ये सुरू झालेली ही स्टार्टअप कंपनी आज संपूर्ण देशातील बिर्याणी खवय्यांसाठी महत्त्वाची बनली असून हे एक प्रसिद्ध असे नाव आहे. आज बिर्याणी बाय किलो हा ब्रँड देशांमध्ये हळूहळू प्रसिद्ध होताना दिसून येत आहे. जेव्हा या ब्रँड ची सुरुवात झाली ती अगदी छोट्या स्तरावर झाली होती व सुरुवातीला या ब्रँडची केवळ काही लाख रुपयांची बिर्याणी विकली गेली.

परंतु कौशिक रॉय आणि विशाल जिंदाल त्यांची दृष्टी मात्र खूप मोठी होती व त्या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले व फूड इंडस्ट्रीमध्ये आपला एक ठसा उमटवावा ही त्यांच्या मनामध्ये इच्छा असल्यामुळे त्यांनी पारंपारिक पद्धतींचा वापर करून बिर्याणी तयार करणे सुरू ठेवले

व निष्ठावान ग्राहक वर्ग त्यांच्या सभोवताली गोळा केला. जर आपण बिर्याणी बाय किलोची बिर्याणी पाहिली तर ती चार प्रकारची बिर्याणी जास्त प्रसिद्ध असून यामध्ये हैदराबादी, लखनवी, कोलकाता आणि गुंटूर याचा समावेश आहे.

या चारही प्रकारच्या बिर्याणीची त्याची त्याची स्वतःची खासियत आहे व चव देखील वेगवेगळे आहे. तसेच बिर्याणी सोबत कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांना कोरमा तसेच डेसर्ट व कबाब इत्यादी  पदार्थ देखील ऑफर केले जातात.

 किती आहे बिर्याणी बाय किलोचे साम्राज्य?

सध्या जर आपण मीडिया रिपोर्ट नुसार बघितले तर बिर्याणी बाय किलो या स्टार्टअप कंपनीला प्रत्येक महिन्याला 22 ते 25 कोटी रुपयांपर्यंत महसूल मिळतो व यामध्ये सतत वाढ होत असताना दिसून येत आहे. ग्राहकांची मागणी सतत वाढत असल्यामुळे बिर्याणी बाय किलोने संपूर्ण देशामध्ये 45 पेक्षा जास्त शहरात 100 पेक्षा जास्त आउटलेट सुरू केलेले आहेत.

आजमीतिला बिर्याणी बाय किलोचे साम्राज्य 840 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.एवढेच नाही तर बिर्याणी बाय किलोची लोकप्रियता बिग बॉस या शो पर्यंत देखील पोहोचली असून त्यामधील स्पर्धकांनी देखील या बिर्याणीचा आस्वाद घेतलेला होता.

अशा पद्धतीने आपल्याला दिसून येते की जिद्दीने सुरू केलेला व्यवसाय ग्राहकांची गरज ओळखून व व्यवसायात त्यानुरूप बदल करत गेले तर यशाच्या शिखरावर पोहोचायला वेळ लागत नाही.

Ajay Patil