आर्थिक

Business Success Story: मसाला व्यवसायातून तरुणाची उलाढाल आहे 30 लाख! वाचा सागर गुंजाळचा प्रेरणादायी प्रवास

Published by
Ajay Patil

Business Success Story:- मनामध्ये कुठलीही गोष्ट करण्याची जिद्द असली आणि ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले प्रयत्न आणि सातत्य व चिकाटी इत्यादी गुण असले तर व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो हे आपण समाजातील अनेक यशस्वी व्यक्तींकडे पाहून सांगू शकतो.

कारण यश हे एका रात्रीत कधीच मिळत नसते व यशाच्या शिखरावर चालताना जर कष्ट आणि जिद्द ठेवली व कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करून मार्ग काढत चालले तर यशापर्यंत माणूस पोहोचते.

याच मुद्द्याला धरून जर आपण सोरतापवाडी या हवेली तालुक्यातील छोट्याशा गावातील सागर गुंजाळ या 27 वर्षीय तरुणाची यशोगाथा पाहिली तर ती या मुद्द्याला साजेशी आहे.या तरुणाने मसाला व्यवसायात चांगला जम बसवला असून त्याची महिन्याची उलाढाल 30 ते 35 लाख रुपये पर्यंतचे आहे. या लेखामध्ये आपण सागर गुंजाळचा प्रेरणादायी प्रवास पाहणार आहोत.

 मसाला व्यवसायातून करतो महिन्याला 30 ते 35 लाख रुपयांची उलाढाल

याबाबत सविस्तर वृत्त असे की, हवेली तालुक्यातील सोरतापवाडी या गावचा रहिवासी असलेले 27 वर्षाचा सागर गुंजाळ हा उच्चशिक्षित असून त्याने लंडनमध्ये जाऊन एमबीएची पदवी पूर्ण केलेली आहे व नंतर भारतात येऊन त्यांनी व्यवसाय करण्याचे ठरवले.

व्यवसायाची निवड करताना मात्र कोणता करावा हे सुचत नसल्यामुळे त्यांनी अगोदर सहा महिने संपूर्ण बाजारपेठेचा अभ्यास केला व हा अभ्यास करून आपण फुड इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करू शकतो या निर्णयापर्यंत तो पोहोचला. त्यानंतर त्याने मसाला बाजारपेठेचा अभ्यास करायला सुरुवात केली व त्याची मार्केटिंग देखील शिकून घेतली. त्यानंतर मात्र त्याने मसाला व्यवसाय सुरू केला.

गेल्या तीन वर्षापासून सागर गुंजाळ यांनी मसाल्याचा स्वतःचा साजुक नावाचा ब्रँड तयार केला असून या ब्रँड अंतर्गत तो आता व्यवस्थितपणे हा व्यवसाय सांभाळत आहे. सुरुवातीला त्याला या व्यवसायामध्ये अडचणी आल्या आणि हा मसाल्याचा ब्रँड नवीनच असल्यामुळे  लोकांचा विश्वास जिंकणे खूप गरजेचे होते व याकरिता त्यांनी मार्केटिंगच्या अनेक पद्धती वापरल्या.

मसाला तयार करताना मात्र सागरने कॉलीटीमध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड केली नाही. सागरच्या मसाल्यांची किंमत थोडी जास्त होती परंतु कॉलिटी चांगली असल्याने हळूहळू लोकांच्या पसंतीस हा मसाला पडायला लागला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या व्यवसायामध्ये सागर गुंजाळच्या पाठीशी वडिलांचा हात भक्कमपणे राहिल्यामुळे त्याला अडचणीच्या कालावधीमध्ये देखील खूप सोप्या पद्धतीने मार्ग काढता आला.

सागर सध्या साजूक ब्रँड अंतर्गत 18 प्रकारचे मसाले तयार करतो व  या तयार मसाल्यांची पाच रुपयाची पॅकिंग ते पाच किलो पर्यंतची पॅकिंग साईजमध्ये तो विक्री करतो. सुरुवातीला सागर गुंजाळ याला मसाला व्यवसायातून 70 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत नफा मिळायला लागला.

परंतु आता व्यवसायाची वाढ झाली असून विक्री देखील वाढल्याने महिन्याला तीस ते पस्तीस लाखापर्यंत उलाढाल या व्यवसायातून होत आहे. मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने अडचणींवर मात करत सागरने हा टप्पा गाठला असून कुठलेही ध्येय जर आपण ठरवले व त्यासाठी काम केले तर आपण यशस्वी होतो हे आपल्याला सागर गुंजाळ यांच्या उदाहरणावरून दिसून येते.

Ajay Patil