आर्थिक

Business Tips: तरुणांनो व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर ‘या’ गोष्टींची घ्या काळजी! तरच होईल व्यवसाय यशस्वी व कमवाल पैसा

Published by
Ajay Patil

Business Tips:- नोकऱ्यांची उपलब्धता असल्यामुळे अनेक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे बरेच तरुण आता व्यवसायांकडे वळत आहेत. परंतु व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसायाची निवड करताना आपल्याला अनेक गोष्टींच्या बद्दल विचार करणे खूप गरजेचे असते.

अगदी छोट्या छोट्या बाबींवर अभ्यास पूर्ण रीतीने संशोधन करून व्यवसायाला सुरुवात करणे कधीही फायद्याचे ठरते. कारण तरुणपणामध्ये जर व्यवसाय सुरू केला तर त्याचे दीर्घकालीन फायदे खूप चांगले मिळतात व या कालावधीत सुरू केलेले व्यवसाय यशस्वी होण्याची शक्यता देखील जास्त असते.

परंतु व्यवसाय सुरू करण्याआधी काही गोष्टींची काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे असते. नेमक्या त्या गोष्टी कोणत्या? जेणेकरून त्यांचा विचार किंवा अभ्यास करून आपण व्यवसाय सुरू केला तर यश मिळू शकते. याबद्दलची माहिती या लेखात घेणार आहोत.

 व्यवसाय सुरू करताना या गोष्टींची काळजी घ्या

1- तुम्ही निवडत असलेल्या व्यवसाय किंवा व्यवसायाची कल्पना खरंच व्यवहार्य आहे का?- जेव्हा तुम्ही व्यवसाय सुरू करतात तेव्हा तुम्हाला तो यशस्वी व्हावा असे वाटत असते व त्याकरिता तुम्ही कुठले उत्पादन तयार करणार आहात किंवा कुठली सेवा देणार आहात त्यापासून ते त्याची मार्केटिंग पर्यंत योग्य माहिती करून त्या प्रकारे व्यावसायिक कल्पनेची निवड करावी.

तसेच तुम्ही जो काही व्यवसाय करण्याचे ठरवले आहे तो कितपत यशस्वी होऊ शकतो याबद्दलचे अंदाज तुम्ही आजकालच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अगदी सहजतेने लावू शकतात. त्यामुळे संबंधित व्यवसायाची मागणी आणि त्याची मार्केटिंग त्याबद्दल विचार करून व्यवसायाची सुरुवात करावी.

2- व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाचा ग्राहक कोण असेल त्यांना कशाची गरज आहे हे ओळखणे तुम्ही एखादा व्यवसाय सुरू करण्याचे निश्चित केल्यानंतर तुमचे उत्पादन कोणाला विकायचे आहे किंवा तुमची सेवा कोण वापरणार आहे हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे. तुमचा व्यवसाय तुमच्या ग्राहकांची कोणती गरज पूर्ण करणार आहे किंवा कोणती समस्या सोडवणार आहे? याबद्दल विचार करणे गरजेचे आहे.

तसेच तुमच्या व्यवसायाचे ग्राहक जे असतील त्यांच्या आवडी आणि नापसंती काय आहेत? तसेच आमचे ग्राहक तुम्ही देत असलेले उत्पादन किंवा सेवा घेण्याची शक्यता कुठे जास्त आहे? या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही ग्राहक प्रोफाइल तयार करू शकता व त्यानुसार व्यवसायाची आखणी करू शकतात.

3- व्यवसायाच्या संबंधित असलेल्या कायदेशीर बाबी समजून घेणे तरुण असले तरी देखील तुम्ही व्यवसाय सुरू करत असाल तर त्या व्यवसाय संबंधित कायदेशीर बाबी पूर्ण करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जो व्यवसाय सुरू करणार आहात त्यासाठी तुम्हाला काही परवानगी आणि कागदपत्रांची गरज आहे का?

हे पाहणे महत्त्वाचे आहे व असेल तर  आवश्यक परवानगी आणि कागदपत्रे मिळणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना विक्री किंवा सेवा कुठल्याही अडथळा विना देता येईल.

4- ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?- हा एक व्यवसाय सुरू करण्यासाठी चा एक महत्त्वाचा टप्पा आहे. आपण युनिक सेलिंग पॉईंट अर्थात यूएसपी देखील म्हणतो. यामध्ये तुम्हाला तुमचे उत्पादन/ सेवा काय आहे आणि तुमचा ग्राहक कोण आहे? हे माहित झालेले असते परंतु तुमचे ग्राहक तुमच्याकडून तुमचे सेवा किंवा उत्पादन का खरेदी करतील किंवा अशा वस्तू व उत्पादन खरेदी करण्यासाठी तुम्हाला का निवडतील?

हे शोधून काढणे खूप गरजेचे आहे व हाच तुमचा युनिक सेलिंग पॉईंट असतो. तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत तुमचे जे काही प्रतिस्पर्धी असतील त्यापेक्षा तुम्ही खूपच कमी किमतीमध्ये उत्पादन/ सेवा ग्राहकांना देत आहात? यासोबतच तुम्ही ग्राहकांना असा अनुभव देत आहात जो तुमच्या ग्राहकाला कुठेही मिळत नाही?

अशा संबंधित प्लॅनिंग करणे गरजेचे असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व त्यांचे समाधान व्हावे याकरिता तुमच्या व्यवसायाचा यूएसपी शोधणे खूप गरजेचे आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर इतर व्यावसायिक स्पर्धकांपेक्षा तुम्ही ग्राहकांना कितपत चांगले उत्पादन किंवा सेवा देऊ शकत आहात? या गोष्टींचा विचार करून तसे प्लॅन करणे महत्त्वाचे असते.

5- मार्केटिंगची प्लॅनिंग कशी कराल?- प्रत्येक क्षेत्रामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढलेली असून अनेक जण आता व्यवसायांकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. एवढेच नाहीतर तरुण उद्योजकांना अशा कालावधीत आर्थिक नियोजन पाळणे खूप गरजेचे आहे.

त्यामुळे मिळवलेले ज्ञान व सुरुवातीला खर्च केलेला पैसा यामध्ये तुम्ही कमीत कमी खर्चात ग्राहक कसे मिळवू शकतात याचा शोध घेणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया या माध्यमाचा वापर करून  ग्राहक ओळखू शकतात आणि तुमच्या व्यवसायाशी निगडित असलेले ग्राहकांना टार्गेट करणे हे सोशल मीडियामुळे तुम्हाला शक्य होऊ शकते.

तुमचा व्यवसायाच्या माध्यमातून तुम्ही काही स्थानिक सेवा देत असाल तर काही ओळखीच्या लोकांच्या नेटवर्किंग द्वारे तुम्ही जाहिरात करणे, बिझनेस कार्ड छापणे आणि ते पोस्ट करणे आणि फ्लायर्स लावणे या माध्यमातून तुम्ही स्थानिक ग्राहकांना टार्गेट करून ग्राहक वाढवू शकतात. तसेच ऑनलाईन पद्धतीने जर व्यवसाय घेऊन जात असेल तर मात्र फायदाच फायदा होतो.

6- येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षाची योजना तयार ठेवा तरुणपणामध्ये जर व्यवसाय सुरू केला तर हा आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. त्यामुळे या निर्णयाचा दुरगामी परिणाम तुमच्या संपूर्ण आयुष्यावर होणार असतो.

याकरिता पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुमचा व्यवसाय कुठे जायला हवा यावर तुम्ही अतिरिक्त विचार करणे गरजेचे असून पुढील दहा ते वीस वर्षाची योजना आखून त्यानुसार आतापासून प्लॅनिंग करून कामाला लागणे गरजेचे असते.

Ajay Patil