आर्थिक

Real Estate Investment Tips: घर,फ्लॅट जागा खरेदी करा! परंतु त्या अगोदर…. या गोष्टी विचारात घ्या; तरच मिळेल फायदा

Published by
Ajay Patil

Real Estate Investment Tips:- गुंतवणुकीचे जितके पर्याय सध्या उपलब्ध आहेत त्यामध्ये रियल इस्टेट मधील गुंतवणुकीकडे आता जास्त प्रमाणात गुंतवणूकदारांचा कल असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कारण रिअल इस्टेटच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून मिळणारा परतावा बघितला तर तो चांगला मिळत असल्याने आता रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणूकदारांना खुणावत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

परंतु गुंतवणूक म्हटले म्हणजे थोडीफार जोखीम त्यामध्ये येते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रांमध्ये किंवा कुठल्याही पर्यायांमध्ये गुंतवणूक करत असाल तर अगोदर त्या क्षेत्राविषयी किंवा त्या विषयी संपूर्ण माहिती काढणे व स्वतः रिसर्च करणे खूप गरजेचे ठरते.

आता आपण बघतो की रियल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली तर नफा चांगला मिळतो. परंतु यामध्ये देखील मालमत्ता खरेदी करताना किंवा घेताना त्याविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.

त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करण्याअगोदर आपल्याला काही महत्त्वाचे घटक जाणून घेणे देखील तितकेच आवश्यक असते. जेणेकरून केलेल्या गुंतवणुकीपासून आपल्याला चांगला परतावा तर मिळेलच आणि भविष्यात होणारा मानसिक त्रास देखील होणार नाही.

 रिअल इस्टेटमधील गुंतवणूक याआधी या गोष्टींचा विचार करा

1- प्रॉपर्टीच्या योग्य लोकेशनची निवड रियल इस्टेटमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्याआधी संबंधित प्रॉपर्टीचे लोकेशन निवडणे महत्त्वाचे राहते. कारण लोकेशन हा घटक मालमत्तेवर खूप मोठा प्रभाव टाकत असतो. तुमच्या प्रॉपर्टीचे मूल्य देखील लोकेशनच्या माध्यमातून ठरते.

तुम्ही जर चांगल्या परिसरामध्ये आणि सगळ्या पायाभूत सुविधा असलेल्या ठिकाणी जर मालमत्ता विकत घेत असाल तर त्या ठिकाणी किंमत जास्त असू शकते. त्यामुळे बिल्डर मालमत्तेचे व्हॅल्युएशन ठरवताना लोकेशनची तुलना करू शकतो. त्यामुळे उत्तम लोकेशन असलेल्या ठिकाणीच तुम्ही पैसे गुंतवणे गरजेचे आहे.

2- रियल इस्टेटमधील गुंतवणुकीचे ध्येय ठरवा प्लान बनवा रियल इस्टेट म्हणजे प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. परंतु ती गुंतवणूक करण्यामागे तुमचे ध्येय काय आहे हे ठरवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लगेच नफा पाहिजे की दीर्घकाळ रेंटमधून स्थिर उत्पन्न मिळवायचे आहे? या गोष्टी बघणे खूप गरजेचे आहे.

म्हणूनच तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत व रिस्क घेण्याची तयारी निश्चित करणे यामध्ये आवश्यक आहे. याकरिता गुंतवणुकीच्या ध्येयावर काम करणे गरजेचे आहे. जेव्हा तुमचे गुंतवणुकीचे ध्येय निश्चित असेल तेव्हा तुम्ही यामध्ये चांगला निर्णय घेऊन चांगली गुंतवणूक करू शकता.

3- आर्थिक नियोजन आवश्यक रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याअगोदर पैशांचा बजेट बसवणे खूप आवश्यक असते. त्यामुळे तुम्ही किती पैसे गुंतवू शकता हे नक्की तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे.

तसेच गुंतवणूक करताना पैशांचा फ्लो कशा पद्धतीने ठेवावा लागेल याचा प्लॅन तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे. त्यामुळे पैशांचे पूर्ण प्लॅनिंग करून तुम्ही या क्षेत्रात उतरल्यास तुम्हाला पुढे जास्त अडचण येणार नाही. तुम्ही या क्षेत्रातील तज्ज्ञांची देखील मदत घेऊ शकतात.

4- योग्य धोरण हवे महत्वाचे म्हणजे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याअगोदर गुंतवणुकीचे ठोस धोरण बनवणे खूप गरजेचे आहे. या धोरणामध्ये गुंतवणुकीचे उद्दिष्ट तसेच गुंतवणुकीची रिस्क आणि उपलब्ध साधनांचा विचार होणे खूप गरजेचे आहे.

तसेच मार्केटचा सध्याचा कल काय आहे आणि भविष्यात काय राहू शकतो? याबद्दल तुम्ही रिसर्च करणे गरजेचे आहे व त्यातूनच आर्थिक परिस्थितीचा विचार करून पाऊल उचलणे महत्त्वाचे ठरते.

5- मार्गदर्शन घ्यावे रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आहात व रिस्क कमी करायचे आहे तर तुम्ही या क्षेत्रातील एखाद्या जाणकाराचा सल्ला घेऊनच पाऊल उचलणे महत्त्वाचे ठरते. कारण रिअल इस्टेट क्षेत्र बरेच गुंतागुंतीचे असते व त्यामुळे जाणकारांचे मार्गदर्शन घेऊन गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

6- छोटी सुरुवात करावी या क्षेत्रामध्ये तुम्ही नवीनच पदार्पण करत असाल तर मात्र सुरुवातीला एकच मालमत्ता घ्यावी व जास्तीत जास्त दोन मालमत्ता घेण्याचा विचार करावा.

यामुळे तुम्ही संभाव्य होणारे नुकसान टाळू शकतात व  छोट्याशा व्यवहारातून तुम्ही या क्षेत्राचा अनुभव घेऊन पुढे या क्षेत्रात चांगली प्रगती करू शकतात. त्यामुळे छोट्या सुरुवातीनेच या क्षेत्रात पाऊल ठेवणे गरजेचे आहे.

Ajay Patil