अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-महामारीच्या दृष्टीने अधिकाधिक लोक सार्वजनिक वाहनापेक्षा वैयक्तिक वाहने अधिक सुरक्षित मानत आहेत. यामुळेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीत तेजी दिसून आली.
म्हणून जर आपण देखील त्यांच्यात सामील असाल व आपण स्वत: ची कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल पण आपले जर बजेट कमी असेल तर नक्कीच हि बातमी वाचा.
जुनी कार घेण्यापूर्वी लोकांच्या मनात असा प्रश्न पडतो की, जुन्या कारची खरेदी कुठे करावी? वास्तविक, बाजारात असे अनेक पर्याय आहेत जे सेकंड हॅन्ड कारची विक्री करतात.
जर आपणही गोंधळाच्या स्थितीत असाल तर याठिकाणी आम्ही एक पर्याय सुचवणार आहोत. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन मारुती सुझुकी सेकंड-हँड गाड्यांची विक्री देखील करते.
कंपनी आपल्या ट्रू व्हॅल्यू स्टोअरमधून स्वतःची सेकंडहँड वाहने विकते. येथे आपल्याला 2 लाख ते 3 लाख रुपयांच्या रेंजमधील कार मिळू शकतात. येथे आम्ही तुम्हाला त्याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या काही कार विषयी सांगणार आहोत –
Wagon R LXI:- कंपनी 2016 चे मॉडेल Wagon R LXI विकत आहे. पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी ही कार 3,75,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही फर्स्ट ऑनर कार आहे. ही कार 77,873. किमी चालली आहे.
Alto 800 LXI:- कंपनी 2013 मॉडेल Alto 800 LXI विकत आहे. पेट्रोल इंजिन असलेली ही कार 1,65,000 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही फर्स्ट ऑनर कार आहे. ही कार 68,219 किमी चालली आहे.
Wagon R VXI:- कंपनी 2014 चे मॉडेल वॅगन आर व्हीएक्सआयची विक्री करीत आहे. पेट्रोल आणि सीएनजीवर चालणारी ही कार 2,63,591 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. ही फर्स्ट ऑनर कार आहे. ही कार 13,775 किमी चालली आहे.
टीपः येथे दिलेल्या वाहनांशी संबंधित माहिती ट्रू व्हॅल्यू वेबसाइटवरील माहितीनुसार आहे. जुनी कार खरेदी करताना, कागदपत्रे आणि कारची स्थिती स्वतः तपासा. वाहनाच्या मालकास भेट न घेता किंवा वाहन न तपासता ऑनलाईन व्यवहार करू नका.