आर्थिक

DA Hike: मार्चमध्ये  केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी खुशखबर! महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार? समजून घ्या किती होणार पगारवाढ?

Published by
Ajay Patil

DA Hike:- सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची प्रतीक्षा असून लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या डीएमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर आपण काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर त्याच्यानुसार केंद्र सरकारच्या माध्यमातून येत्या मार्चमध्ये महागाई भत्तात चार टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

या अगोदर केंद्र सरकारने ऑक्टोबर 2023 मध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली होती व तो 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आलेला होता. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत आहे.

परंतु आता अहवालानुसार पाहिले तर केंद्र सरकारने मार्चमध्ये महागाई  भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केल्यास हा महागाई भत्ता 46% वरून 50% पर्यंत वाढेल. जर असे झाले तर देशातील सुमारे 48.67 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 67.95 लाख निवृत्ती वेतनधारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे वाढीव महागाई भत्त्याचा लाभ एक जुलै 2023 पासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. आपल्याला माहित आहेच की, वाढत्या महागाईच्या परिस्थितीमध्ये सरकार कर्मचाऱ्यांचे जीवनमान राखण्याकरिता जो काही पैसा देते त्यालाच महागाई भत्ता असे म्हटले जाते.

महागाई भत्त्याची जी काही गणना आहे ती देशाच्या सध्याचा महागाईनुसार केली जाते व ती प्रत्येक सहा महिन्यांनी केली जात असते. वेतन श्रेणी वर आधारित कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनानुसार महागाई भत्त्याची गणना केली जाते. मागील भत्ता हा शहरी तसेच ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळा असू शकतो.

 केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता मोजण्याचे सूत्र

 केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता ठरवता यावा याकरिता एक सूत्र देण्यात आले असून ते सूत्र म्हणजे [( गेल्या बारा महिन्याच्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी(AICPI)-115.76)/115.76]×100 अशा प्रकारचे आहे.

 पीएसयु अर्थात सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता गणना करण्याची पद्धत

 सार्वजनिक क्षेत्रामध्ये म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील युनिटमध्ये जे काही व्यक्ती काम करतात त्यांच्या महागाई भत्ता गणना करण्याची पद्धत ही

 महागाई भत्ता टक्केवारी =( गेल्या तीन महिन्यांच्या ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी( आधारभूत वर्ष 2001=100)-126.33))×100 हे आहे.

 महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ झाल्यास किती पगार वाढ होईल?

 महागाई भत्त्यात वाढ झाल्यास पगार किती वाढेल हे जर तुम्हाला काढायचे असेल तर तुमचा पगार खाली दिलेल्या सूत्रांमध्ये भरणे गरजेचे आहे व ते सूत्र म्हणजे…

( मूलभूत वेतन+ ग्रेड वेतन)× महागाई भत्ता%= महागाई भत्ता रक्कम

 जर आपण हे उदाहरणावरून समजून घेतले तर अगदी सोपे झाले. समजा तुमचा मूळ पगार दहा हजार रुपये आहे आणि ग्रेड पे एक हजार रुपये आहे. तर तुमच्या मूळ पगार आणि ग्रेड पे मिळून एकूण 11 हजार रुपये होतात. जर आपण 50 टक्के महागाई भत्त्यात वाढ झालेली ठरली

तर ती 5500 होईल. सर्व जोडून तुमचा एकूण पगार हा 16 हजार पाचशे रुपये होतो. सध्या मिळणाऱ्या 46% महागाई भत्त्याच्या बाबतीत सध्या 16060 रुपये पगार मिळत आहे. म्हणजेच महागाई भत्यात चार टक्क्यांची वाढ झाली तर प्रत्येक महिन्याला 440 रुपयांचा फायदा होणार आहे.

Ajay Patil