Cashew Processing :- भारताचा विचार केला तर भारतामध्ये महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओरिसा, केरळ, कर्नाटक, गोवा, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रामुख्याने काजूचे उत्पादन घेतले जाते. विशेष म्हणजे महाराष्ट्रामध्ये काजूचे सर्वाधिक उत्पादन होते. जर आपण महाराष्ट्रातील काजूचा विचार केला तर विदेशात देखील या ठिकाणच्या काजूला खूप मोठी मागणी असल्यामुळे काजूप्रक्रिया उद्योगाला खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळू शकतो. परंतु काजू प्रक्रिया उद्योगाची आज जितकी मागणी आहे तितका काजू भारतामध्ये अजून देखील उत्पादित होत नाही.
त्यामुळे बऱ्याच प्रमाणात कच्च्या काजूची आयात करावी लागते. तर सध्या आपल्याकडच्या विचार केला तर कच्चा काजू बियांचे प्रती हेक्टरी सरासरी उत्पादन 840 किलोग्रॅम इतके आहे व एका वर्षाचे उत्पादन हे चार लाख टन इतके आहे. तुम्हाला जर शेतीशी निगडित असणार आहे एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही काजूप्रक्रिया उद्योग सुरू करू शकतात. या अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काजू प्रक्रिया उद्योग विषयी महत्वपूर्ण माहिती घेणार आहोत.
काजू प्रक्रिया उद्योगा विषयी माहिती
काजू चा विचार केला तर त्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून भारतामधून विदेशात निर्यात होणारा महत्त्वाचा कृषी माल म्हणून काजू ओळखला जातो. भारतामध्ये काजू प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरिता भारतीय काजू निर्यात प्रमोशन कौन्सिल हे काजू आणि काजू शेल लिक्विड ला प्रोत्साहन देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. जर तुम्हाला देखील हा फायदेशीर असणारा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही काजू प्रक्रिया युनिट सुरू करू शकतात.
काजू प्रक्रिया युनिट मध्ये काजू कसा तयार केला जातो?
या आधी सगळ्यात अगोदर दोन ते तीन दिवस एका मोकळ्या जागेमध्ये काजू उन्हात सुकवले जातात. तसेच त्यांना नियमितपणे वर खाली केले जाते जेणेकरून हे कडक होतील आणि समान स्वरूपात ते सुकले जातील हा त्यामागचा उद्देश असतो. ही प्रक्रिया काजुतील जास्तीचा जो काही ओलावा असतो तो काढून टाकण्यासाठी मदत करते. त्यानंतर काजूला भाजले जाते आणि त्याच्या फळाचे जे काही बाहेरील आवरण असते ते तोडून आतून काजु बाहेर काढला जातो. त्यानंतर काजूची गुणवत्ता तपासली जाते आणि काही महिला काजू वेगळे करायला बसतात आणि हाताने ड्रायफ्रूट्स उघडतात.
यामध्ये काजू सोलण्याची प्रक्रिया खूप महत्त्वपूर्ण असून ही प्रक्रिया म्हणजे काजू वर चिकटलेले जो काही टेस्टा म्हणजे बाहेरील सेल( कठीण आवरण ) असते ते काढून टाकले जाते व त्यानंतर ते कंप्रेस्ड एअरवेने घासले जातात. यानंतर शेवटचा टप्पा येतो की ज्यामध्ये महिला काजू मधून अशुद्ध घटक वेगळे करण्यासाठी बसतात आणि त्यानंतर काजूला ओव्हनमध्ये 70 डिग्री सेल्सिअस आणि होईला मध्ये भाजले जाते. या सगळ्या प्रक्रियेनंतर काजू बाजारात विक्रीसाठी तयार होतो.
काजू प्रक्रिया उद्योगातील आर्थिक गणित
तुम्हाला देखील काजूप्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्यासाठी पंधरा हजार रुपयांपर्यंत खर्च हा कच्चामालासाठी येतो व त्या माध्यमातून तुम्हाला 50 किलो काजू मिळतो. एवढ्या काजू पासून तुम्ही चाळीस हजार रुपयांचा प्रक्रियायुक्त काजूची विक्री करू शकता. या माध्यमातून तुम्हाला 60 किलो काजू आवरण मिळते व त्याला शंभर रुपये प्रति किलो असा दर मिळतो. एकंदरीत आकडेवारीचा विचार केला तर पंधरा हजार रुपयांच्या कच्च्या मालाचे रूपांतर 46 हजार रुपयांमध्ये होते.
योग्य प्रकारे विक्री व्यवस्थापन आणि नियोजन ठेवले तर या उद्योगांमध्ये खूप मोठ्या संधी असून या माध्यमातून तुम्ही जर 100 क्विंटल काजू बिया घेतल्या तर त्यापासून 50% पर्यंत काजू मिळतो. तुम्हाला जर काजू प्रक्रिया युनिट उभा करायचा असेल तर त्याकरिता एक स्टीमर, एक बॉयलर, दोन कटर व एक ड्रायर आणि साल काढणारे यंत्र यांचा समावेश असतो.
जर आपण कच्च्या काजूची किंमत पाहिली तर ती दीडशे रुपये प्रति किलो असून यापासून तयार होणाऱ्या अंतिम उत्पादनाची किंमत आठशे रुपये पर्यंत पोहोचते. जरी सरासरी 600 रुपये किंमत पकडली तरी कच्चामाल ते प्रक्रिया उत्पादन यामध्ये दुपटीपेक्षा अधिक आर्थिक नफा मिळतो.
काजू प्रक्रिया उद्योगातून तयार होणारी उत्पादन
या उद्योगाच्या माध्यमातून आहारामध्ये समाविष्ट करता येतील असे विविध प्रकारचे पदार्थ तयार होतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर काजू पासून बर्फी तसेच काजू करी, खारवलेले काजू आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यापासून तयार करता येणारा उपपदार्थ म्हणजे काजूच्या बोंडापासून तयार करण्यात येत असलेले द्रव्य होय. या द्रव्यांचा वापर हा रंग उद्योगांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.