आर्थिक

Central Bank Recruitment: सेंट्रल बँकेमध्ये ‘या’ पदाच्या तब्बल 3000 जागांवर होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Published by
Ahmednagarlive24 Office

Central Bank Recruitment:- बँकांच्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी असून देशातील महत्त्वाचे असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे.

त्यामुळे पदवीधर असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरतीकरिता पदानुसार अहर्ता धारण करणारे उमेदवारांकडून याकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत व इच्छुक उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदाचे नाव आणि एकूण रिक्त पदसंख्या

ही भरती प्रक्रिया सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवण्यात येत असून या माध्यमातून शिकाऊ उमेदवारी ही पदे भरली जाणार आहेत व एकूण पदसंख्या 3000 पदे इतकी आहे.

कोणत्या राज्यामध्ये भरली जाणार किती पदे?

अंदमान आणि निकोबार एक जागा, आंध्र प्रदेश 100 जागा, अरुणाचल प्रदेश एकूण दहा जागा, आसाम एकूण 70 जागा, बिहार एकूण 210 जागा चंदीगड एकूण अकरा जागा, छत्तीसगड एकूण 76 जागा, दादरा आणि नगर हवेली व दिव आणी दमन एकूण तीन जागा, दिल्ली एकूण 90 जागा, गोवा एकूण 30 जागा, गुजरात एकूण 270 जागा, हिमाचल प्रदेश एकूण 26 जागा, हरियाणा एकूण 95 जागा, जम्मू आणि काश्मीर एकूण आठ जागा, महाराष्ट्र एकूण 320 जागा, मध्य प्रदेश एकूण तीनशे जागा, उत्तर प्रदेश एकुण ३०५ जागा याशिवाय इतर राज्यांमध्ये देखील या जागा भरल्या जाणार आहेत.

या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या शिकाऊ उमेदवार या पदाच्या तीन हजार जागांच्या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी पदवीधर किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण करणे गरजेचे आहे.
निवडीनंतर किती मिळेल पगार?
सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये इतका पगार मिळेल.
काय आहे अर्ज करण्याची शेवटची मुदत?
सेंट्रल बँकेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या शिकाऊ उमेदवार या पदाच्या भरतीसाठी ज्या इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करायचा असेल ते 17 जून 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करावा?
या भरतीच्या अधिक माहितीसाठी https://www.centralbankofindia.co.in/

या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता.
Ahmednagarlive24 Office