7th Pay Commission:- एक फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून या अर्थसंकल्पच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना काही महत्त्वाच्या गिफ्ट सरकारच्या माध्यमातून दिल्या जातील अशी एक शक्यता आहे. त्यातील जर पहिले गिफ्ट पाहिले तर ते महागाई भत्ता वाढीच्या स्वरूपामध्ये असण्याची शक्यता आहे.
यामध्ये जर आपण पाहिले तर जुलै 2023 ते डिसेंबर २०२३ या सहा महिन्याच्या कालावधीचा आधारे जानेवारी 2024 पासून कर्मचाऱ्यांना नवीन वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे. मार्च 2024 मध्ये याबाबतची घोषणा केली जाईल. नेमक्या याबाबत काय शक्यता आहेत? याबद्दलची माहिती आपण बघू
या भत्यात होणार तीन टक्क्यांची वाढ
सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 46 टक्के इतका महागाई भत्ता मिळत असून लवकरच तो 50% च्या पुढे जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर महागाई भत्ता वाढ झाली तर त्यासोबत कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला घर भाडेभत्त्यात देखील वाढ होणार आहे. या मध्ये वाढ करण्यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून काही नियम स्पष्ट करण्यात आलेले आहेत व हे नियम केवळ महागाई भत्त्याची संबंधित आहे.
या अगोदरची घर भाडेभत्त्यामधील सुधारणा ही 2021 मध्ये करण्यात आली होती व तेव्हा महागाई भत्ता 25% च्या पुढे गेला होता. सध्या जर आपण शहरांच्या श्रेणीनुसार घर भाडेभत्त्याचे दर पाहिले तर ते 27, अठरा आणि नऊ टक्के अशी आहे. जर महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढला किंवा पोहोचला तर घर भाडेभत्यामध्ये पुन्हा एकदा तीन टक्क्यांची सुधारणा करण्यात येणार आहे.
शहरांच्या श्रेणीनुसार घरभाडे भत्त्याचा फायदा कसा मिळणार?
जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या घर भाडे भत्त्याचा विचार केला तर त्यातील सुधारणा महागाई भत्त्यावर आधारित आहे. वाढीव एचआरए अर्थात घर भाडेभत्त्याचा लाभ सर्व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सध्या शहरांच्या श्रेणीनुसार 27%, 18 आणि नऊ टक्के दराने एचआरए मिळत आहे. जर घरभाडे भत्त्यातील पुढील सुधारणा तीन टक्क्यांची असेल.
त्याचा जर आपण याचा दर पाहिला तर तो 27% आहे व पुनरावलोकनानंतर घर भाडेभत्ता हा 30% असेल. परंतु जेव्हा महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचेल तेव्हाच हे शक्य होणार आहे. जर महागाई भत्ता 50% पर्यंत पोहोचला तर एचआरए शहरांच्या श्रेणीनुसार म्हणजेच एक्स श्रेणीसाठी 30%, वाय श्रेणीसाठी 20 टक्के आणि झेड श्रेणीकरिता दहा टक्के वाढण्याची शक्यता आहे.
सध्या एक्स श्रेणीमध्ये कर्मचाऱ्यांना 27% घर भाडे भत्ता मिळत आहे व त्यात तीन टक्क्यांची वाढ झाली तर तो 30 टक्के होईल. वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना 18% घरभाडे भत्ता मिळत असून तो 20 टक्क्यांपर्यंत वाढेल. तसेच झेड श्रेणीतील कर्मचाऱ्यांना नऊ टक्के इतका घरभाडे भत्ता मिळत असून तो दहा टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.