आयोगाअंतर्गत आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये सरकारी तिजोरीवर एक लाख कोटी रुपयांचा भार पडला होता. १९४७ सालानंतर आतापर्यंत सरकारकडून सात वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी, लाभासह भत्ते निश्चित करण्यात वेतन आयोगाची महत्त्वाची भूमिका असते.
केंद्रासोबतच राज्येदेखील आयोगाच्या शिफारशी लागू करत असतात. फिटमेंट फैक्टरमुळे पगार, पेन्शनमध्ये होणार मोठी वाढ आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना भरघोस वेतनवाढ मिळणार आहे.शिपायापासून ते आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.
सातवा वेतन आयोग जेव्हा लागू करण्यात आला होता, तेव्हा लेव्हल वनचे कर्मचारी शिपाई, सफाई कामगार यांसारख्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन १८,००० रुपयांवर पोहोचले होते. जर आठवा वेतन आयोग लागू झाला, तर त्यांचे बेसिक वेतन २१.३०० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
लेव्हल २ च्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन सातवा वेतन आयोग लागू झाला तेव्हा १९,९०० इतके होते, ते वाढून २३,८८० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता आहे. लेव्हल तीनच्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन २१,७०० वरून २६,०४० रुपये, लेव्हल चारच्या कर्मचाऱ्यांचे बेसिक वेतन २५,५०० वरून २०,६०० वर, तर लेवाल पाचच्या कर्मचाऱ्यांचे वेतन २९,२०० वरून ३५,०४० वर पोहोचण्याची शक्यता आहे