Child Investment Plan : ‘ही’ एक योजना करते बाप-मुलाचं टेन्शन छूमंतर; फक्त 1000 रुपये भरा आणि कोट्याधीश बना

Published on -

Child Investment Plan : भाजप सरकराने देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी योजना आणली आहे. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) मध्ये दरवर्षी फक्त 1000 रुपये जमा करून पालक त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू शकणार आहेत. यातील खास गोष्ट म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या नावाने एनपीएसमध्ये पैसे जमा करता येतात. एनपीएस वात्सल्य योजना पालकांना पेन्शन खात्यात गुंतवणूक करून त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी बचत करण्याची सुविधा प्रदान करते.

काय आहे योजना

देशातील लाखो पालक ऑनलाइन किंवा बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन एनपीएस वात्सल्य योजनेचा घेऊ शकतात. एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत, तुम्ही मुलांच्या नावाने 1000 रुपयांचे खाते उघडून योगदान देऊ शकता. यानंतर भागधारकांना दरवर्षी १००० रुपये योगदान द्यावे लागतील. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित एनपीएस खात्यात रूपांतरित होईल. तथापि, एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात पेन्शन वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावरच मिळेल.

कसे मिळतील पैसे

जर तुम्ही मुलांच्या नावाने 1000 रुपयांचे खाते उघडले तर मुल 18 वर्षांचे होईपर्यंत तुम्हाला त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे. खाते सुरु केल्यापासून पुढच्या आठरा वर्षे तुम्ही या खात्यात 2 लाख 16 हजार रुपये जमा करता. या रकमेवर तुम्हाला वार्षिक 10 टक्के परतावा मिळतो. म्हणजेच ही रक्कम 6 लाख 1 हजार 909 रुपये होते.

कोट्याधीश कसे होणार

एनपीएस वात्सल्य योजनेअंतर्गत मुल 18 वर्षांचे झाल्यावर तुम्लाहा 2.5 लाख रुपये काढण्याची परवानगी मिळते. बाकीचे पैसे तुम्ही पेन्शन योजनेत गुंतवू शकता. जर ही गुंतवणूक वयाच्या 60 व्या वर्षांपर्यंत असेल, तर तुमच्या खात्यात 4 कोटी रुपये जमा होतील. ते तुमच्या पेन्शन फंडात जमा राहतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe