आर्थिक

CIBIL च्या बाबतीत नका घेऊ रिस्क! क्रेडिट कार्ड वापरण्याचे जाणून घ्या ‘हे’ नियम

Published by
Ratnakar Ashok Patil

Cibil Score:- सध्याच्या युगात ऑनलाईन बँकिंग आणि क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अनेकजण विविध ऑफर्स आणि त्वरित आर्थिक गरजा भागवण्यासाठी क्रेडिट कार्डचा सर्रास वापर करतात. मात्र योग्य पद्धतीने क्रेडिट कार्ड हाताळले नाही तर तुमच्या CIBIL स्कोअरवर मोठा परिणाम होऊ शकतो. बऱ्याच लोकांना याची पूर्ण माहिती नसते आणि त्यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोअर खराब होतो.

CIBIL स्कोअर म्हणजे काय?

CIBIL स्कोअर हा तुमच्या आर्थिक शिस्तीचा आरसा असतो. हा स्कोअर 300 ते 900 या श्रेणीत असतो. 750 पेक्षा जास्त स्कोअर असेल तर तुम्हाला सहजपणे कर्ज आणि क्रेडिट कार्ड मिळू शकते.

पण जर तुमचा स्कोअर 600 च्या खाली गेला तर बँका आणि NBFC कंपन्या तुम्हाला कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे CIBIL स्कोअर चांगला राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

CIBIL स्कोअर खराब होण्याची कारणे

बर्‍याच जणांना वाटते की काही दिवस क्रेडिट कार्डचे उशिरा बिल भरले तरी चालते. मात्र, उशिरा भरलेले पेमेंट देखील CIBIL स्कोअरवर परिणाम करत असते.

तुम्ही जर बिल वेळेवर भरले नाही तर बँका तुम्हाला वित्तीय शिस्त नसलेल्या ग्राहकांच्या यादीत टाकतात. तसेच वारंवार अशा चुका केल्यास तुमचा स्कोअर वेगाने घसरतो.त

सेच तुमच्या कार्डवर जर 2 लाख मर्यादा असेल आणि तुम्ही संपूर्ण मर्यादा खर्च करत असाल तर बँक तुम्हाला जास्त खर्च करणारा आणि कर्ज न फेडू शकणारा ग्राहक समजते.

याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. आर्थिक तज्ज्ञांच्या मते तुमच्या क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 30-40% पेक्षा जास्त खर्च करू नये. म्हणजेच जर तुमची मर्यादा ₹2 लाख असेल, तर 50,000 – 80,000 हजारच्या दरम्यानच खर्च करणे फायदेशीर ठरेल.

याशिवाय जर तुम्ही अल्प कालावधीत अनेक कर्जे किंवा क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला तर बँका आणि आर्थिक संस्था तुम्हाला आर्थिक अडचणीत असलेला ग्राहक मानतात. परिणामी, CIBIL स्कोअर घटतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे खूप जणांना वाटते की जुने क्रेडिट कार्ड बंद केल्याने फायदा होतो. पण प्रत्यक्षात याचा उलट परिणाम होतो.

कारण तुमच्या जुना क्रेडिट इतिहास मजबूत असतो आणि तो बंद केल्याने तुमच्या क्रेडिट प्रोफाईलवरील विश्वासार्हता कमी होते. त्यामुळे जर कार्ड बंद करायचे असेल तर फक्त उच्च वार्षिक शुल्क असलेली किंवा अत्यंत कमी वापरली जाणारी कार्डेच बंद करा.

कधी कधी आपण मित्र किंवा कुटुंबासाठी कर्जाच्या हमीदार राहतो.मात्र जर संबंधित व्यक्तीने कर्ज फेडले नाही किंवा उशिरा हप्ते भरले तर याचा परिणाम तुमच्या CIBIL स्कोअरवर होतो. त्यामुळे हमीदार बनण्यापूर्वी योग्य विचार करा.

CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी टिप्स

क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा कार्ड मर्यादेच्या 30-40% च्या आतच खर्च करा. जुन्या आणि वेळेवर भरलेल्या कर्ज खात्यांना सक्रिय ठेवा.नवीन कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी वारंवार अर्ज करू नका. आपल्या क्रेडिट स्कोअरचा नियमित तपास करा.

Ratnakar Ashok Patil