Credit Card Bill : तुम्हालाही क्रेडिट कार्डचे बिल भरता येत नाही? चिंता सोडा, फक्त फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card Bill : सध्याच्या काळात अनेकजण खरेदीसाठी क्रेडिट कार्डाचा वापर करताना दिसत आहेत. जर तुम्ही क्रेडिट कार्ड पेमेंट करत असताना योग्य ती काळजी घेतली नाही तर याचा तुम्हाला खूप फटका बसू शकतो. क्रेडिट कार्डचा वापर करणे खूप सोयीस्कर असते.

तसेच त्याचे अनेक फायदेही असतात. परंतु तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्ही क्रेडिट कार्डचे बिल वेळेत भरले नाही तर तुमच्या खिशावर ताण येतो. अशातच काहीजणांना क्रेडिट कार्डचे बिल भरण्यात काही अडचणी येत आहेत. मात्र तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.

असे भरा बिल

जर तुम्हाला तुमचे क्रेडिट कार्ड बिल भरण्यात अडचण येत असेल तर, याचा तुमच्या CIBIL स्कोअरवर परिणाम दिसून येईल. असे झाले तर तुम्हाला भविष्यात कर्ज मिळणे थोडे अवघड होईल. जर तुम्ही बिल भरण्यास सक्षम नसल्यास आता तुम्ही ते ईएमआयमध्ये रूपांतरित करू शकता. त्यामुळे तुम्हाला क्रेडिट कार्डची संपूर्ण शिल्लक एकाच वेळी भरण्याची गरज पडणार नाही.

ट्रान्सफर शिल्लक

समजा तुम्ही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरत असल्यास तुम्हाला त्याचा फायदा घेता येईल. आता तुम्ही एका क्रेडिट कार्डची शिल्लक दुसऱ्या क्रेडिट कार्डमध्ये ट्रान्सफर करता येईल. त्यामुळे तुम्हाला बिल भरण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी तुम्हाला व्याज द्यावे लागत नाही.

असेही येईल भरता

आता तुम्ही कर्ज घेऊन क्रेडिट कार्डचे बिलही भरू शकता. समजा तुम्ही एफडी किंवा पीपीएफ किंवा अशा कोणत्याही योजनेत गुंतवणूक केली असल्यास तुम्हाला त्यावर कर्जाची सुविधा मिळू शकते. तुम्ही त्या ठिकाणी कर्ज घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी तुमचे बजेट बिघडणार नाही.

तसेच क्रेडिट बिल भरण्यासाठी तुम्ही टॉप-अप कर्ज घेता येईल. टॉप अप कर्जामध्ये, तुमच्या अगोदर चालू असणाऱ्या कर्जावर बँकेकडून अतिरिक्त रक्कम देण्यात येते. हे लक्षात घ्या की ही एक प्रकारची अॅड ऑन सुविधा आहे.