Credit Card Using Tips : क्रेडिट कार्ड महत्वाचे का आहे? क्रेडिट कार्डचे प्रकार किती? जाणून घ्या वापरण्याच्या योग्य पद्धती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit Card Using Tips : देशात दिवसेंदिवस ऑनलाईन आर्थिक व्यवहार प्रणालीचा वापर झपाट्याने वाढत आहे. तसेच अनेकजण आता क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. क्रेडिट कार्डमुळे अनेकांना आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे.

क्रेडिट कार्डचे अनेक फायदे देखील आहेत आणि तोटे देखील आहेत. क्रेडिट कार्ड सध्या अनेक तरुण वापरत आहेत. मात्र क्रेडिट कार्ड वापरत असताना अनेक गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

सर्वात प्रथम जाणून घ्या क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

तुम्हाला बँकेकडून डेबिट कार्डसारखे एक कार्ड दिले जाते मात्र डेबिट कार्डपेक्षा वेगेळे असते. डेबिट कार्डवरून तुम्ही स्वतःचे पैसे बँकेतून काढू शकता तर क्रेडिट कार्डवरून तुम्ही बँकेकडून पैसे वापरण्यास घेऊ शकता.

तुम्ही शॉपिंग करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही ऑनलाईन आर्थिक कामासाठी क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. क्रेडिट कार्डवरून तुम्ही त्वरित तुमची गरज भागवू शकता. मात्र हे पैसे तुम्हाला दिलेल्या तारखेमध्ये भरावे लागतील.

क्रेडिट कार्डचे प्रकार किती?

सामान्य क्रेडिट कार्ड
वैशिष्ट्यीकृत क्रेडिट कार्ड
व्यवसाय क्रेडिट कार्ड
विशेष क्रेडिट कार्ड

क्रेडिट कार्ड असणे का आवश्यक आहे?

क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही त्वरित पैशांची गरज भागवू शकता. क्रेडिट कार्डवर तुम्हाला आकर्षक बक्षिसे, कॅशबॅक, सवलत, ऑफर दिल्या जातात त्यामुळे एकप्रकारचा तुमचा फायदाच होत आहे.

क्रेडिट कार्डद्वारे तुम्हाला काढलेले पैसे ईएमआयद्वारे पुन्हा पेमेंट भरावे लागेल. क्रेडिट कार्डमधील सर्व व्यवहार सुरक्षित असतात कारण त्यांना ओटीपी आणि पिन पडताळणी आवश्यक असते.

क्रेडिट कार्डची देय रक्कम भरण्यासाठी 45 दिवसांपर्यंतचा क्रेडिट-मुक्त कालावधी देखील उपलब्ध आहे. याशिवाय क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे सहज व्यवहार करता येतो.

क्रेडिट कार्डवरून कर्ज घेण्याची योग्य पद्धत

क्रेडिट कार्ड वापरणे अगदी सोपे आहे. तसेच त्यावरून कर्ज घेणे देखील सहज शक्य आहे. सरकारी आणि खाजगी बँका क्रेडिट कार्ड कर्ज सुविधा देतात. ज्या बँकेचे क्रेडिट कार्ड आहे तुम्ही त्यांच्याकडून सहज कर्ज घेऊ शकता.

कर्ज घेण्यासाठी प्रथम बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. जर बँकेने क्रेडिट कार्डसाठी अतिरिक्त वेबसाइट तयार केली असेल, तर बँकेच्या अधिकृत वेबसाइटऐवजी बँकेच्या क्रेडिट कार्ड वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला क्रेडिट कार्ड कर्जाच्या पर्यायावर जाऊन अर्ज करावा लागेल, जिथे तुम्हाला काही महत्त्वाचे तपशील भरण्याचा पर्याय मिळेल.

ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि कार्डचे शेवटचे चार अंक शेवटी टाकावे लागतील. या काही सोप्या मार्गांनी तुम्ही क्रेडिट कार्डवरून कर्ज घेऊ शकता.

क्रेडिट कार्ड वापरताना काय लक्षात ठेवावे?

1. क्रेडिट कार्डद्वारे किती पैसे खर्च केले आहेत ते लक्षात ठेवणे गरजेचे आहे

प्रत्येकाला क्रेडिट हे त्यांच्या सिबिल स्कोअर आणि आर्थिक व्यवहारावर दिले जाते. तसेच जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला खर्चाचा तपशील ठेवणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला महिन्याच्या शेवटी क्रेडिट कार्डवरून काढलेले पैसे भरावे लागतील.

क्रेडिट कार्डवरून वापरलेल्या पैशांचा तपशील ठेवणे अगदी सोपे आहे. कारण आता मोबाईल अॅपवर सर्व माहिती उपलब्ध असते. तुम्ही खर्चाचा तपशील जाणून घेतला तर अनावश्यक खर्च टाळता येतो.

2. सर्व आवश्यक सुविधांचा लाभ घ्या

क्रेडिट कार्डवर अनेक ऑफर आणि रिवॉर्ड पॉइंट्स दिले जातात. याशिवाय तुम्ही खर्च न करता अनेक महत्त्वाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकता, ज्यात विमानतळावरील लाउंज बेनिफिट, रेस्टॉरंटच्या बिलावर सूट, सिनेमा हॉल तिकिटावर सूट यासारख्या पर्यायांचा समावेश आहे.

3. CIBIL स्कोअर संतुलित ठेवावा

क्रेडिट कार्ड वापरताना अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. क्रेडिट कार्ड वापरताना ते ५० टक्केच वापरावे. क्रेडिट कार्ड मर्यादेच्या 50% च्या वापरामुळे CIBIL स्कोअर खूप चांगला राहतो.

4. देय तारखेपूर्वी थकबाकी भरा

क्रेडिट कार्ड वापरल्यानंतर तुम्ही त्याचे बिल वेळे अगोदर भरावे. क्रेडिट कार्डचे बिल पुन्हा भरण्यासाठी तुम्हाला ५० दिवस दिले जातात. मात्र जर तुम्ही वेळेअगोदर पैसे भरल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला होतो. तसेच तुम्हाला दंड देखील भरावा लागत नाही.

5. महत्वाची माहिती गोपनीय ठेवली पाहिजे

जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर त्याची संपूर्ण माहिती गोपिनीय ठेवली पाहिजे. कारण आजकाल सायबर गुन्हांमध्ये अधिक वाढ झाली आहे. कार्डचा नंबर, त्याची एक्सपायरी डेट आणि सिक्युरिटी पिन कोणालाही शेअर करू नये.