DA Hike 2023 : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी काही दिवसापूर्वीच केंद्र सरकारने मोठी घोषणा करत महागाई भत्ता 38 वरून 42 टक्क्यांवर पोहोचला होता. यातच आता मिळालेल्या माहितीनुसार आम्ही तुम्हाला सांगतो पुढील DA वाढ जुलैमध्ये होणार आहे. यानंतर DA 46% वर जाण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे काही मीडिया रिपोर्ट्सनुसार आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेत केंद्र सरकार फिटमेंट फॅक्टर वाढविण्याचा निर्णय घेऊ शकते किंवा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा नवीन फॉर्म्युला ठरवू शकते. मात्र हे लक्षात घ्या कि सरकारकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के आहे आणि महागाई भत्ता 42 टक्के आहे, सध्या 7व्या वेतन आयोगाच्या आधारे वेतन दिले जात आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता, 7 व्या वेतन आयोगाअंतर्गत फिटमेंट फॅक्टर 2.57 वरून 3.00 टक्के किंवा 3.68 टक्के वाढवता येऊ शकतो.
7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे 2024 मध्ये फिटमेंट फॅक्टर वाढविला जाऊ शकतो. 2024 मध्ये निवडणुका होणार असल्याने फिटमेंट फॅक्टर 2026 पासून लागू केला जाऊ शकतो. याचा फायदा 50 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना होईल.
यापूर्वी केंद्र सरकारने 2016 मध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली होती आणि या वर्षापासून 7 वा वेतन आयोग देखील लागू करण्यात आला आणि कर्मचाऱ्यांचे किमान वेतन थेट 6000 रुपयांवरून 18,000 रुपये करण्यात आले आणि आता जर मोदी सरकारने फिटमेंट फॅक्टरचे दर वाढवले तर रिव्हिजन झाले, कर्मचाऱ्यांचे पगार अडीच पटीने वाढतील, म्हणजेच मूळ पगार 18000 वरून 21000 किंवा थेट 26000 पर्यंत वाढेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्मचारी बर्याच काळापासून ते वाढवण्याची मागणी करत होते, खर्च विभाग कर्मचार्यांच्या मागण्यांवर विचार करेल आणि पुनरावलोकनाच्या आधारावर दिलेल्या शिफारसी अर्थ मंत्रालयाकडे पाठवल्या जाण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी नवीन वेतन आयोगाच्या स्थापनेच्या वेळी समान फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेतला जाऊ शकतो.
7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग न आणून पगारवाढीचा नवा फॉर्म्युला सरकार आणू शकते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काही ठराविक अंतराने आपोआप वाढणार आहेत. ही एक ‘ऑटोमॅटिक पे रिविजन सिस्टम’ असू शकते, ज्यामध्ये डीए 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पगारात ऑटोमॅटिक सुधारणा होईल. असे झाल्यास 68 लाख केंद्र सरकारचे कर्मचारी आणि 52 लाख पेन्शनधारकांना त्याचा थेट लाभ मिळेल.
जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18,000 रुपये असेल, तर भत्ते वगळता त्याचा पगार 18,000 X 2.57 = 46,260 रुपये असेल. फिटमेंट फॅक्टर 3.68 असल्यास, पगार 95,680 रुपये असेल (26000 X 3.68 = 95,680) म्हणजे, पगारात 49,420 रुपये नफा होईल. फिटमेंट फॅक्टरच्या 3 पटीने, पगार 21000 X 3 = 63,000 रुपये असेल. कर्मचार्यांचे फिटमेंट फॅक्टर वाढविल्यास 15500 चे मूळ वेतन 15500*2.57 = 39,835 रुपये होऊ शकते.